पुरातील बाधित कुटुंंबांना मिळाली रक्कम

पुणे : आंबील ओढ्याला आलेल्या पुरातील बाधित कुटुंंबांना राज्य सरकारकडून प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत देण्यास सुरवात झाली आहे. संबंधित कर्मचारी घराेघरी जाऊन हे रक्कमेचे धनादेश वाटत

पुणे : आंबील ओढ्याला  आलेल्या पुरातील बाधित कुटुंंबांना राज्य सरकारकडून प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत देण्यास सुरवात झाली आहे. संबंधित कर्मचारी घराेघरी जाऊन हे रक्कमेचे धनादेश वाटत आहेत.

गेल्यावर्षी २५ सप्टेंबरला आंबील ओढ्याला पुर आला हाेता. या पुराचे पाणी लगतच्या घरामध्ये शिरल्याने नुकसान झाले हाेते. तसेच यात काही जणांचे प्राणही गेले हाेते. या पुरानंतर काही रक्कम पुरग्रस्तांनी दिली गेली हाेती. उर्वरित दहा हजार रुपयाचा धनादेश नागरिकांना वाटण्यास अखेर सुरुवात झालेली आहे. याविषयी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नगरसेविका अश्वीनी कदम यांनी पुणे महानगरपालिका प्रशासन , जिल्हाधिकारी, पुणे शहर तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा केला हाेता. या पूरग्रस्त नागरिकांना पंधरा हजार रुपये मदत झाली हाेती. पाच हजार रुपये त्यांना तत्काळ दिले गेले हाेते, उर्वरीत दहा हजार रुपये मिळावेत यासाठी पुणे शहर तहसीलदार  तृप्ती कोलते  यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी पुरग्रस्तांकडून बॅंक खात्याचा तपशील मागविला हाेता. हा तपशील मिळाल्यानंतर मदत वाटप सुरू झाली आहे.