मान्सूनचं आगमन लांबणीवर, केरळमध्ये 3 जूनला धडकणार

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विशेषतः कोल्हापूर, सांगली ,सातारा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडू शकतो. आयएमडीचे माजी प्रमुख हवामानतज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी याविषयी माहिती दिली आहे. केरळात मान्सून 3 जूनला तारखेला दाखल होईल मात्र राज्यातील परिस्थिती पाहता तो वेळेत न येता चार पाच दिवस उशिरा येण्याची शक्यता आहे.

    पुणे: राज्यात पुढील पाच दिवस हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय. राज्यावरती कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय, त्यामुळे बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण होतंय, त्यामुळेच पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. याबाबत आयएमडीचे माजी प्रमख हवामानतज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी माहिती दिली.

    मान्सून महाराष्ट्रात कधी पोहोचणार याविषयी देखील साबळे यांनी अंदाज व्यक्त केला आहे. हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सुून केरळमध्ये 3 जूनला दाखल होईल.