बारामती वकील संघटनेने केला कोरोना योद्ध्यांचा विशेष सन्मान

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती वकील संघटनेच्या वतीने कोरोना काळात ज्यांनी स्वतः चा जीव धोक्यात घालून समाजसेवेचे काम केले. त्या कोरोना योद्ध्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

    कार्यक्रमाचे आयोजन कोरोनाबाबतचे नियम पालन करून करण्यात आले होते. यावेळी कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून कार्य केलेल्या डॉ. खोमणे, डाॅ. काळे, डाॅ. अडसूळ, डॉ भोई, डॉ दराडे, सचिन कदम, बारामती नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, शितोळे व त्यांचे बारामती नगर परिषदेमधील सहकारी यांचा त्यांच्या कार्याबद्दल जिल्हा न्यायाधीश जे .पी दरेकर, एस. टी भालेराव, आर. व्ही. लोखंडे, एक. ए शहापुरे, डी. बी. बांगडे, जे. ए. शेख आदी जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

    तसेच बारामती वकील संघटनेचे सदस्य ऍड. पी. टी. गांधी यांनी कोरोना काळात गरजूंना अन्नदान केले व ऍङ. अमर महाडीक यांनी कोविड सेंटरच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कार्याबद्दल त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष ऍङ. चंद्रकांत सोकटे यांनी केले. सूत्रसंचालन ऍङ. अनिल होळकर यांनी केले.

    या कार्यक्रमावेळी उपाध्यक्ष बापूराव शिंगाडे, सचिव ऍङ. अजित बनसोडे, ग्रंथपाल ऍङ. स्वरूप सोनवणे, महिला प्रतिनिधी ऍङ. प्रणिता जावळे आदींसह सर्व वकील सदस्य कोरोना नियमांचे पालन करून उपस्थित होते.