महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयासमोरून दुचाकी चोरीला

पिंपरी चिंचवड़ महापालिका अ क्षेत्रीय कार्यालयासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी भर दिवसा चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. ६) भेळ चौक, निगडी येथे घडली.

    पिंपरी:  पिंपरी चिंचवड़ महापालिका अ क्षेत्रीय कार्यालयासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी भर दिवसा चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. ६) भेळ चौक, निगडी येथे घडली. उदय उत्तम पाटील (वय ३१ रा. गुरुदत्त कॉलनी, देहूरोड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    फिर्यादी पाटील यांनी आपली ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी भेळ चौक निगडी येथील अ क्षेत्रीय कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी साडेसात वाजता पार्वâ केली होती. सायंकाळी सात वाजता ते पुन्हा दुचाकी घेण्यासाठी आले असता दुचाकी चोरीला गेल्याचे दिसून आले. निगडी पोलिस तपास करत आहेत.