भर चौकात केलेला वाढदिवस नडला ; सरपंचासह अनेक प्रतिष्ठातांवर गुन्हा दाखल

कोरोनाचे नियम पाळा म्हणून सगळ्या गावाला शहाणपणा शिकवणाऱ्या सरपंचानेच भर रस्त्यावर वाढदिवस साजरा केला आहे. लोकाला ब्रम्हज्ञान सांगणाऱ्या या सरपंचाकडून गावकऱ्यांनी कोणता आदर्श घ्यावा.

    अकलूज: सार्वजनिक रोडवर बेकायदेशीरपणे लोकांची गर्दी करुन वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी सरपंचासह अकलूज व संग्रामनगरमधील अनेक प्रतिष्ठीतांवर अकलूज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    याबाबत अकलूज पोलीसांकडून मिळालेली माहीती अशी की, अकलूज येथील जुन्या बस स्थानक चौकामध्ये काही इसम बेकायदेशीरपणे विनामास्क, कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा करत असल्याची माहीती मिळाली. यावेळी अकलूज पोलीस घटनास्थळी पोहोचले असता रफिकभाई पठाण व यासिन बागवान (व्यापारी) यांचा वाढदिवस धुमधङाक्यात भर चौकात सुरु होता.

    हे सुद्धा वाचा

    अकलूज पोलीसांनी वाढदिवस साजरा करणाऱ्या कमालभाई शेख (सरपंच संग्रामनगर ग्रामपंचायत), रशिदभाई मुलाणी (भाजपा माळशिरस तालूका अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष), जमिर चौधर (उपाध्यक्ष भाजपा अल्पसंख्यांक सेल), रियाजभाई शेख, भैया माढेकर (व्यापरी), नजिम खान, सोमनाथ पवार, महेंद्र साठे, सुधाकर बनसोङे, हसन माढेकर, तनवीर पठाण, हमिद मुलाणी यांच्यावर मानवी जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली हयगयची कृती केली म्हणुन भा.द.वि. २६९,१८८,आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ब प्रमाणे सरकारतर्फे पो.क.अमोल बबन पवार यांनी फिर्याद दाखल केली. सदर ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पो काॅ. भोसले, शेख, मपोनी तांबोळी यांनी केली आहे.

    या सरपंचाकडून कोणता आदर्श घ्यावा
    कोरोनाचे नियम पाळा म्हणून सगळ्या गावाला शहाणपणा शिकवणाऱ्या सरपंचानेच भर रस्त्यावर वाढदिवस साजरा केला आहे. लोकाला ब्रम्हज्ञान सांगणाऱ्या या सरपंचाकडून गावकऱ्यांनी कोणता आदर्श घ्यावा असा प्रश्न संग्रामनगरचे नागरीक विचारत आहेत.