Chimurdi was looking at her mother from the third floor, bent down, suddenly lost her balance and

    इंदापूर : तालुक्यातील सरडेवाडी गावच्या हद्दीत बामणस्थळ परिसरात बुधवारी (दि.२५) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अंदाजे दोन ते तीन वर्षे वयाच्या अज्ञात बालिकेचा मृतदेह आढळून आला. या संदर्भात सरडेवाडीचे सरपंच सिताराम किसन जानकर यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

    जानकर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बसले असता सोमनाथ कोळेकर यांनी फोन करुन या घटनेची माहिती दिल्याचे त्यांनी खबरीत म्हटले आहे. पोलीस नाईक अमित चव्हाण पुढील तपास करत आहेत.

    ही मुलगी ऊस तोडकामगाराच्या अथवा भटके विमुक्तांच्या कुटुंबातील असावी. एखाद्या असाध्य रोगाने आजारी असल्यास, खर्च करण्याची ऐपत नसलेल्या आई-वडीलांनी तिला तेथेच सोडले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

    याबाबत ‘नवराष्ट्र’शी बोलताना जानकर म्हणाले की, या भागातील कोणी बेपत्ता असल्याचे ऐकले नाही. मयत मुलगी या परिसरातील नाही.