बेपत्ता तरूणाचा मृतदेह नदीत मिळाला

भोर : रविवारी रात्री तालुक्यातील सारोळे गावच्या हद्दीतील पुलावरून बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह मंगळवारी रात्री निरा नदीच्या पात्रात मिळाल्याची माहीती शिरवळ (ता.खंडाळा) पोलिसांनी दिली. प्रणव प्रदिप

भोर : रविवारी रात्री तालुक्यातील सारोळे गावच्या हद्दीतील पुलावरून बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह मंगळवारी रात्री निरा नदीच्या पात्रात मिळाल्याची माहीती शिरवळ (ता.खंडाळा) पोलिसांनी दिली. प्रणव प्रदिप कुलकर्णी (वय-२८) रा.धनकवडी,पुणे असे त्याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार प्रणवसह त्याचे मित्र निखील दिवेकर,अंकुश माने हे तिघेही एका दुचाकीवरून रविवारी रात्री महाबळेश्वरला निघाले होते.कोरोनाच्या जिल्हाबंदी आदेशामुळे पुलावरील चेकपोस्ट नाक्यावर पोलीसांनी त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे ते परत पुण्याच्या दिशेने जाताना निखील व अंकुश पायी तर प्रणव दुचाकीवर होता. परंतू त्यावेळी प्रणव त्यांना दिसेनासा झाल्याने ते परत चेकपोस्ट नाक्यावर येउन शोध घेतला. त्याचा तपास न लागल्याने तो पुलावरून नदीत पडल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.त्यामुळे राजगड व शिरवळ पोलीस वव महाबळेश्वर रेस्कु टिमनो दोन दिवस त्याचा नदीत शोध घेतला. मंगळवारी  रात्री पुलापासून एक किलोमीटर अंतरावर त्याचा मृतदेह सापडल्याचे शिरवळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश हजारे यांनी सांगीतले.