पुण्यात चार महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केलेल्या नवविवाहित तरुणीचा मृतदेह आढळला..! प्रियकराने खून करून पळ काढला?

दिशा आणि अजय दोघेही जनता वसाहत परिसरात राहत होते. 4 महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला आहे. त्यांचं एकमेकांवर प्रेम होत. त्यांनी प्रेम विवाह केलेला होता. दरम्यान ते नुकतेच धायरी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. अजय मिळेल ते काम करत होता. दरम्यान आज सायंकाळी दिशा हीचा मृतदेह आढळून आला.

    पुणे : चार महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केलेल्या नवविवाहित तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे भागात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाला असून, प्रियकर पती पसार झाला आहे.

    दिशा अजय निकाळजे (वय १९, धायरी) असे मृत्यू झालेल्या तरुण विवाहितीचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा आणि अजय दोघेही जनता वसाहत परिसरात राहत होते. 4 महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला आहे. त्यांचं एकमेकांवर प्रेम होत. त्यांनी प्रेम विवाह केलेला होता. दरम्यान ते नुकतेच धायरी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. अजय मिळेल ते काम करत होता. दरम्यान आज सायंकाळी दिशा हीचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अजय हा पसार झाला आहे. दिशा हिच्या गळ्यावर व्रण आहेत. त्यामुळे तिचा खून झालेला असण्याची दाट शक्यता आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.