पुणे महापालिकेत समाविष्ट गावांची तहान भागविण्याचे आव्हान ; दरडोई-दरमाणसी ५५ लिटर

२३ गावांमध्ये साडेपाच लाख लोकसंख्या

    पुणे : राज्य शासनाच्या आदेशानुसार पालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांमध्ये साडेपाच लाख लोकसंख्या आहे. या वाढलेल्या लाेकसंख्येला पाणी पुरवठा करण्याचे अाव्हान महापािलकेसमाेर उभे राहणार आहे. त्याचप्रमाणे जलसंपदा िवभागाकडून पाण्याचा वाढीव काेटाही मिळवावा लागणार आहे.

    समाविष्ट केलेल्या गावांमधील पाण्याच्या आवश्यकतेसंदर्भात पाणी पुरवठा विभागाकडून सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. आजमितीस या गावांमध्ये दरडोई-दरमाणसी ५५ लिटर पाणी दिले जात आहे. समाविष्ट गावांमधील तीन गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा केला जातो. यासोबतच अन्य ७ गावांना ‘बल्क मीटर’द्वारे महापालिकेकडून पाणी पुरविले जाते. उर्वरीत गावांमधील पाण्याचे स्त्रोत काय आहेत, विहिरी अथवा किती टँकरद्वारे किती प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो याबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

    या गावांमधील लोकसंख्या, गावांना होणारा पाणी पुरवठा, प्रत्यक्षातील निकड आणि पालिकेची तयारी यासंदर्भात सर्वेक्षण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पाणी पुरवठ्यासाठी वाहिन्या टाकणे, त्यासाठी आवश्यक तरतूद याचाही विचार करावा लागणार आहे. तुर्तास गावांमध्ये ५५ लिटर प्रति माणसी पाणी देण्याचा निकष असल्याने त्याप्रमाणे पाणी दिले जाईल असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

    सध्या जलसंपदा विभाग आणि महापािलका यांच्यात पाणी काेट्यावरून वाद नेहमीच रंगत आहे. तसेच आता या नवीन गावंासाठी महापालिकेला वाढीव काेटा घ्यावा लागणार असुन, साधारणपणे शहराची गरज १९ टिएमसीच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. शहराला खडकवासला धरण साखळीतून पाणी दिले जात आहे, नुकतेच भामा आसखेड याेजनेतून पाणी पुरवठा हाेऊ लागला अाहे. हा काेटा वाढवून घ्यावे लागणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडूनही त्यांची यंत्रणा महापािलकेला घ्यावी लागेल. त्यासाठीही महापािलकेला निधी आवश्यक आहे.