महापालिकेतील मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याला आता उपायुक्ताचा दर्जा

या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधताना मुख्य सुरक्षा अधिकारी या पदनामाने कामकाजात प्रभाव राहत नाही. तसेच हे पद उपायुक्त या पदाच्या समकक्ष आहे. तसेच या दोन्ही पदांची वेतनश्रेणी समान आहे. त्यामुळे फक्त पदनामात बदल करण्यात यावा, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा प्रस्ताव महापालिका सभेसमोर ठेवण्यात आला.

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या सेवा प्रवेश आणि सेवांचे वर्गिकरण हे अधिकारी, कर्मचारी यांच्या श्रेणी किंवा गटनिहाय तयार करण्यात आले होते. या आकृतीबंधास २० मे २०१६ रोजी मान्यता देण्यात आली. या मान्यतेमध्ये मुख्य सुरक्षा अधिकारी या गट ‘अ’ मधील पदास वेतनश्रेणीनुसार मंजुरी देण्यात आली आहे. सुरक्षा विभागातील मुख्य सुरक्षा अधिकारी यांना महापालिकेच्या सुरक्षाविषयक कामकाजासाठी सतत पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवणे आवश्यक असते. तसेच सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील समन्वय ठेवणे आवश्यक असते. या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधताना मुख्य सुरक्षा अधिकारी या पदनामाने कामकाजात प्रभाव राहत नाही. तसेच हे पद उपायुक्त या पदाच्या समकक्ष आहे. तसेच या दोन्ही पदांची वेतनश्रेणी समान आहे. त्यामुळे फक्त पदनामात बदल करण्यात यावा, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा प्रस्ताव महापालिका सभेसमोर ठेवण्यात आला. या विषयाला नुकत्याच झालेल्या महापालिका सभेत मंजुरी देण्यात आली