महिलेचा विनयभंग करणारा ठेकेदार गजाआड ; मावळ तालुक्यातील घटना

ऑगस्ट २०२० ते ३० मे २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. फिर्यादी महिला घरासमोर काम करत असताना आरोपी रंगराव याने महिलेला अश्लील शिवीगाळ केली. महिला शिरगाव पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी जात असताना आरोपी रंगरावने तिच्याकडे पाहत अश्लील हावभाव केले.

    पिंपरी : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ठेकेदाराला अटक करण्यात आली आहे. ही घटना मावळ तालुक्यातील साळूंब्रे येथे घडली. ठेकेदाराला तळेगाव – दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे.रंगराव सायन्ना गुंडलवार (वय ४३, साई कॉलनी, साळुंब्रे, ता. मावळ) असे अटक केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. पीडित महिलेने तळेगाव – दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    ऑगस्ट २०२० ते ३० मे २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. फिर्यादी महिला घरासमोर काम करत असताना आरोपी रंगराव याने महिलेला अश्लील शिवीगाळ केली. महिला शिरगाव पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी जात असताना आरोपी रंगरावने तिच्याकडे पाहत अश्लील हावभाव केले. तसेच माझ्यासोबत फिरायला आली नाहीस तर जीवे मारुन टाकीन, अशी धमकी दिली. तळेगाव – दाभाडे पोलीस तपास करत आहेत.