कोरोना सेंटरसाठी पीपीई कीट, मास्क खरेदीसाठी ८१ लाख खर्च करणार

कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार करताना आवश्यक असणारे पीपीई कीट आणि एन ९५ मास्क असे साहित्य खरेदी करण्यात येते. हे साहित्य तातडीने उपलब्ध करून मिळण्यासाठी वैद्यकीय विभागामार्पâत मागणी करण्यात आली होती

  पिंपरी: महापालिकेची विविध रूग्णालये, कोरोना केअर सेंटर येथील कोरोना बाधीत रूग्णांवरील उपचारासाठी पीपीई कीट आणि एन ९५ मास्क साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी ८१ लाख रूपये खर्च होणार आहेत.

  कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील बाधीत रूग्णांवर महापालिकेची विविध रूग्णालये, कोरोना केअर सेंटर या ठिकाणी उपचार करण्यात येत आहेत. कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार करताना आवश्यक असणारे पीपीई कीट आणि एन ९५ मास्क असे साहित्य खरेदी करण्यात येते. हे साहित्य तातडीने उपलब्ध करून मिळण्यासाठी वैद्यकीय विभागामार्पâत मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पीपीई कीट आणि मास्क खरेदी करण्यासाठी निविदा मागविण्यात आली होती.  या निविदा प्रक्रीयेमध्ये नऊ निविदा धारकांनी भाग घेतला. त्यामध्ये पारस डाईंग अ‍ॅण्ड प्रिटींग मिल्स यांनी प्रति कीट १६२ रूपये अधिक जीएसटी असा लघुत्तम दर सादर केला. या खरेदीसाठी अंदाजित रक्कम ९७ लाख रूपये अपेक्षित धरण्यात आली आहे. पारस डाईंग यांनी ८१ लाख रूपये दर सादर केला आहे. हा दर अंदाजित दरापेक्षा १६.४९ टक्क्याने कमी आहे. त्यानुसार, त्यांच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.

  अ‍ॅन्टीजेन टेस्टसाठी आठ हजार किट खरेदी करणार

  कोरोना रूग्णांचे तातडीने निदान व्हावे याकरिता महापालिकेमार्पâत रॅपिड अन्टीजेन टेस्टचे आठ हजार किट खरेदी करण्यात येणार आहेत. या आठ हजार किटद्वारे कोरोनाच्या तब्बल दोन लाख चाचण्या होऊ शकणार आहेत. त्यासाठी ५० लाख रूपये खर्च होणार आहे. शहरातील कोरोना बाधीतांचा आकडा सध्या २ लाख ६८ हजारावर पोहोचला आहे. शहरातील नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी रॅपिड अन्टीजेन टेस्ट किटस खरेदी करण्याकरिता निविदा नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार, दहा निविदा धारकांनी दरपत्रक सादर केले. त्यामध्ये सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी प्रति टेस्ट २५ रूपये १५ पैसे अधिक ५ टक्के जीएसटी इतका दर सादर केला. हा दर अंदाजित दरापेक्षा ३७.०४ टक्क्यांनी कमी आहे. सध्या बाजारपेठेत कोरोना अ‍ॅन्टीजेन टेस्ट किटच्या किमती पूर्वीपेक्षा खूपच कमी झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने सुदर्शन फार्मा यांनी सादर केलेल्या दराप्रमाणे आठ हजार किट खरेदी करण्यात येणार आहेत. प्रति किट २५ टेस्ट यानुसार आठ हजार किटद्वारे कोरोनाच्या तब्बल दोन लाख चाचण्या होऊ शकणार आहेत. त्यानुसार, या किट खरेदीकरिता ५० लाख ३० हजार रूपये अधिक पाच टक्के जीएसटी इतका खर्च होणार आहे.

  रूबी अलकेअर आयसीयूला मुदतवाढ

  महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील आयसीयू बेडचे कामकाज पाहणाऱ्या रूबी अलकेअर सर्व्हिसेस यांना एक महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना ७४ लाख ४० हजार रूपये देण्यात येणार आहेत. पिंपरी – चिंचवड शहरात कोरोना साथीचा प्रादूर्भाव वाढल्याने तसेच महापालिकेकडे अतिदक्षता विभाग चालविण्यासाठी असलेल्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन सप्टेंबर २०२० मध्ये महापालिका रूग्णालयातील आयसीयू बेड रूबी अलकेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना चालविण्यास देण्यात आले. त्यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयातील १५ बेडसाठी ११ हजार ९९९ रूपये प्रतिबेड प्रति दिन दर सादर केला होता. तो कमी करून ७ हजार ५०० रूपये प्रतिबेड प्रतिदिन असा सुधारीत करण्यात आला. त्याच दराने वायसीएम रूग्णालयातील आयसीयू क्रमांक १ आणि २ येथील एवूâण ३२ बेडसाठी रूबी अलकेअर यांना चालविण्यास देण्यात आले. रूग्णसंख्येचा अंदाज घेऊन त्यांना दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आली. आता पुन्हा १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंत एक महिना मुदतवाढ देण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार, त्यांना मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यासाठी ७४ लाख ४० हजार रूपये खर्च होणार आहे.