महानगरपालिकेने निवडणूक खर्चाची सव्वा कोटी रक्कम वळवली

पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीचे कामकाज सुरू होणार आहे. याशिवाय सार्वत्रिक निवडणूक २०२२ तसेच जनगणना २०२१ च्या कामकाजही सुरू केले जाणार आहे. यासाठी प्रशासन विभागाकडून दोन कारवून आणि दोन आरेखक पदावरील कर्मचाऱ्यांची आस्थापनेसह निवडणूक विभागात नेमणूक करण्यात आली आहे.

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीच्या कामकाजासह सार्वत्रिक निवडणूक २०२२ तसेच जनगणना २०२१ चे कामकाजही सुरू केले जाणार आहे. या कामकाजासाठी कर्मचाऱ्यांचा पगार आणि वाहन इंधनासाठी तरतुद कमी पडत आहे. त्यासाठी १ कोटी २४ लाख रूपये इतकी तरतुद निवडणूक विभागाकडील ‘निवडणूक खर्च’ या लेखाशिर्षावर असलेल्या १५ कोटी रूपये तरतुदीतून स्थायी आस्थापना आणि वाहन इंधन या लेखाशिर्षावर वळविण्यात येणार आहे.

    पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीचे कामकाज सुरू होणार आहे. याशिवाय सार्वत्रिक निवडणूक २०२२ तसेच जनगणना २०२१ च्या कामकाजही सुरू केले जाणार आहे. यासाठी प्रशासन विभागाकडून दोन कारवून आणि दोन आरेखक पदावरील कर्मचाऱ्यांची आस्थापनेसह निवडणूक विभागात नेमणूक करण्यात आली आहे. सध्या सहायक आयुक्त पद हे आस्थापनेवर असल्याने आणि चार जादा कर्मचाऱ्यांमुळे स्थायी आस्थापना या लेखाशिर्षावर तरतूद कमी पडत आहे. तसेच निवडणूक विभागाकडे यापूर्वी सहायक आयुक्त हे पद आस्थापनेवर नसल्याने सहायक आयुक्त यांच्यासाठी वाहन नव्हते. त्यासाठी इंधनाची तरतुद करण्यात आली नव्हती.

    सध्या सहायक आयुक्त हे पद निवडणूक विभागाच्या आस्थापनेवर आले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवडणूक विभागाकडील कार्यालयीन वापरासाठी असलेले सुमो आणि सहायक आयुक्तांकडील वाहन या दोन्ही वाहनांचा सध्या वापर होत आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या संभाव्य सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचनेचे कामकाज आणि हिंदुस्थानची जनगणना २०२१ चे कामकाज यामुळे दोन्ही वाहनांच्या इंधनासाठी सन २०२१-२२ करिता वाहन इंधन या लेखाशिर्षावर केलेली तरतुद कमी पडत आहे.
    स्थायी आस्थापना या लेखाशिर्षावर मे २०२१ मध्ये मासिक पगारासाठी १० लाख ७७ हजार रूपये इतका खर्च झाला आहे. स्थायी आस्थापना या लेखाशिर्षावर सन २०२१-२२ करिता ८२ लाख ५० हजार रूपये इतकी तरतुद आहे. मे २०२१ अखेर ४१ लाख ९३ हजार रूपये आणि वाहन इंधन या लेखाशिर्षावर सन २०२१-२२ करिता ५५ हजार रूपये इतकी तरतुद केली आहे. मे २०२१ मध्ये ४५ हजार रूपये खर्च झाला आहे. हा खर्च पाहता संभाव्य पुढील नऊ महिन्यांसाठी स्थायी आस्थापना या लेखाशिर्षावर १ कोटी २३ लाख रूपये आणि वाहन इंधन या लेखाशिर्षावर १ लाख ४५ हजार रूपये इतकी तरतुद कमी पडणार आहे. त्यासाठी ही एकूण १ कोटी २४ लाख ४५ हजार रूपये इतकी तरतुद निवडणूक विभागाकडील ‘निवडणूक खर्च’ या लेखाशिर्षावर असलेल्या १५ कोटी रूपये तरतुदीतून स्थायी आस्थापना आणि वाहन इंधन या लेखाशिर्षावर वळविण्यात येणार आहे.