महापालिका रेमडेसीवरची थेट पध्दतीने खरेदी करणार

कोरोना विषाणूमुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य आजारामुळे पिंपरी - चिंचवड शहरात आरोग्य विषयक आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे.त्या अनुषंगाने विविध उपाय योजना आखल्या जात आहेत. महापालिका रुग्णालये, जम्बो कोविड सेंटर, ऑटो क्लस्टर कोविड हॉस्पिटल या ठिकाणी कोरोना विषाणुमुळे संसर्ग झालेल्या बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याकरिता रेमडेसीवर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे .

    पिंपरी: महापालिका रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ३ पुरवठादारांकडून एवूâण २ हजार ६२० रेमडेसीवरचा थेट पध्दतीने खरेदी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला आहे. यासाठी ४० लाख ५८ हजार रुपये इतका खर्च होणार आहे.

    कोरोना विषाणूमुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य आजारामुळे पिंपरी – चिंचवड शहरात आरोग्य विषयक आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे.त्या अनुषंगाने विविध उपाय योजना आखल्या जात आहेत. महापालिका रुग्णालये, जम्बो कोविड सेंटर, ऑटो क्लस्टर कोविड हॉस्पिटल या ठिकाणी कोरोना विषाणुमुळे संसर्ग झालेल्या बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याकरिता रेमडेसीवर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे .

    या करिता महापालिका थेट पध्दतीने ३ पुरवठादारांकडून रेमडेसीवरची खरेदी करणार आहे. मेसर्स फार्मडील यांच्याकडून १ हजार ५१२ दराप्रमाणे १५०० कुपी खरेदी केल्या जाणार आहेत. त्यावर २२ लाख ६८ हजार खर्च होणार आहे. मेसर्स मिलान फार्मासिटीकल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून १ हजार ५६८ दराने १ हजार कुपी खरेदी केल्या जाणार आहेत. त्यासाठी ५ लाख ६८ हजारांचा खर्च येणार आहे. चिंचवड येथील मेसर्स वुंâदन मेडीको यांच्याकडून १ हजार ८४८ या दराने १२० कुपी घेण्यात येणार आहेत. त्यावर २ लाख २१ हजार ७६० खर्च येणार आहे.