वीजवाहिनी हलविण्यासाठी सव्वातीन कोटीचा खर्च

महापालिका विद्युत विभागामार्फत औंध - रावेत रस्त्यावर पिंपरी - चिंचवड महापालिकेमार्फत विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांमध्ये अतिउच्चदाब वाहिनी अडथळा ठरत आहे. त्यामुळे या टॉवरलाईनची अतिउच्चदाब वाहिनी हलवावी लागणार आहे. त्यासाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. ३ कोटी ९ लाख रूपये दर निश्चित करण्यात आला.

    पिंपरी : रावेत रस्त्यावरील वाय जंक्शन ते औंध रूग्णालया दरम्यान रस्त्यातील अती उच्चदाब वीजवाहिनी हलविण्यात येणार आहे. या कामासाठी ३ कोटी २० लाख रूपये खर्च होणार आहेत.

    महापालिका विद्युत विभागामार्फत औंध – रावेत रस्त्यावर पिंपरी – चिंचवड महापालिकेमार्फत विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांमध्ये अतिउच्चदाब वाहिनी अडथळा ठरत आहे. त्यामुळे या टॉवरलाईनची अतिउच्चदाब वाहिनी हलवावी लागणार आहे. त्यासाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. ३ कोटी ९ लाख रूपये दर निश्चित करण्यात आला.

    त्यानुसार, तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी कोंकण मेलॅबल इंडस्ट्रीज या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा जादा म्हणजेच ३ कोटी २० लाख ५० हजार रूपये असा दर सादर केला. कोंकण मेलॅबल यांची निविदा तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची असल्याने ती स्विकृत करण्यास महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी २५ फेब्रुवारी २०२१ रोजी मान्यता दिली.