प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

भोसरीतील बालाजीनगर येथील कारवाई प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रसाद कलाटे यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बालाजीनगर येथे एका महिलेकडे गांजा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, छापा टाकून ही महिलेला जेरबंद केले. तिच्याकडून १९ हजार रूपये किंमतीचा ७६५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला

    पिंपरी :  दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन महिलांकडून पावणेचार किलो गांजा जप्त करण्यात आला. निगडीतील अण्णाभाऊ साठे वसाहत आणि भोसरीतील बालाजीनगर येथे ही कारवाई केली. दोन्ही कारवायांमध्ये महिलांना अटक करण्यात आली आहे.

    निगडीतील कारवाई प्रकरणी पोलीस नाईक विलास केकाण यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी महिलेला एमपीडीएस कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. अटक महिलेने ७३ हजार रुपयांचा २ किलो ९३० ग्रॅम वजनाचा गांजा जवळ बाळगला होता. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला आहे.

    भोसरीतील बालाजीनगर येथील कारवाई प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रसाद कलाटे यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बालाजीनगर येथे एका महिलेकडे गांजा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, छापा टाकून ही महिलेला जेरबंद केले. तिच्याकडून १९ हजार रूपये किंमतीचा ७६५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. फौजदार घिगे तपास करत आहेत.