rape

लग्नाचे अमिष दाखवून एका तरूणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. ही घटना किवळे परिसरातील एका सोसायटीत घडली. या अत्याचारात आरोपीने युवतीच्या शरीरावर अगरबत्तीचे चटके दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

पिंपरी : लग्नाचे अमिष दाखवून एका तरूणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. ही घटना किवळे परिसरातील एका सोसायटीत घडली. या अत्याचारात आरोपीने युवतीच्या शरीरावर अगरबत्तीचे चटके दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तसेच या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रकरणाची चौकशी केली. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीला आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली. तसेच तिचे टॉपलेस फोटो घरच्यांना पाठविण्याची धमकी दिली. यावेळी आरोपीने तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिच्या हातावर, पायावर अगरबत्तीचे चटके दिले.

दरम्यान, याप्रकरणी एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.