क्रूरपणाचा कळस! ‘या’ क्षुल्लक कारणावरून तरुणाला केली दगडाने मारहाण

पिंपरी - पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथील दळवीनगर परिसरात सिगारेट दिली नाही म्हणून, एका तरूणाला दगडाने मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास

पिंपरी –  पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथील दळवीनगर परिसरात सिगारेट दिली नाही म्हणून, एका तरूणाला दगडाने मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणाचा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.   

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती हे आपल्या घरी झोपले होते. परंतु बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन मारेकऱ्यांनी त्यांचा घराचा दरवाजा ठोठावला. तसेच हे आरोपी दरवाजा उघडून बाहेर आले असता, त्यांच्या तोंडओळखीच्या आरोपींनी त्यांच्याकडे सिगारेट मागितली. मात्र मृत व्यक्तीने त्यांना सिगारेट दिली नाही. या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या आरोपींनी त्यांना दगडाने मारहाण कली. दरम्यान, पोलिस स्टेशनमध्ये या गंभीर प्रकरणाची नोंद केली असून, पोलिस त्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.