छायाचित्र ओळ:-पेरणे-कोरेगाव भीमा मधील भीमा नदीवरील बंधारा पुलाची धोकादायक झालेली दुरवस्था.
छायाचित्र ओळ:-पेरणे-कोरेगाव भीमा मधील भीमा नदीवरील बंधारा पुलाची धोकादायक झालेली दुरवस्था.

वाघोली: शिरूर-हवेली तालुक्यांना जोडणाऱ्या पेरणे-कोरेगाव भीमा मधील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची धोकादायक दुरावस्था झाली असून बंधारा दुरूस्ती करण्याची मोठ्या प्रमाणावर नितांत गरज असून कोरेगाव भिमा,डिंग्रजवाडी,पेरणेगाव येथील शेती व नागरिकांचे जनजीवन व उद्योगांसाठी आवश्यक असणारे पाणी या बंधाऱ्यावर अवलंबून आहे.पाटबंधारे खात्याचे येथील बंधाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

वाघोली: शिरूर-हवेली तालुक्यांना जोडणाऱ्या पेरणे-कोरेगाव भीमा मधील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची धोकादायक दुरावस्था झाली असून बंधारा दुरूस्ती करण्याची मोठ्या प्रमाणावर नितांत गरज असून कोरेगाव भिमा,डिंग्रजवाडी,पेरणेगाव येथील शेती व नागरिकांचे जनजीवन व उद्योगांसाठी आवश्यक असणारे पाणी या बंधाऱ्यावर अवलंबून आहे.पाटबंधारे खात्याचे येथील बंधाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

या बंधाऱ्यामधून पाण्याची गळती होत असून त्यामुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.नदीचे पाणी अडवण्यासाठी अत्यावश्यक असलेले लोखंडी ढापे (लोखंडी गेट) कुजलेले व गंजलेले असून त्याला मोठ्या प्रमाणावर छिद्रे अपलेले असून त्याची खूप मोठी दुरावस्था झालेली आहे पण गेल्या दोन वर्षांपासून सदर ढापे (लोखंडी गेट) बदलण्याची गरज निर्माण झाली असून ते बदलण्याकडे पाटबंधारे खात्यातील अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.बंधाऱ्यासाठी  साधारणपणे ३१९ ढाप्यांची आवश्यकता असते यांपैकी फक्त ४० चांगले ढापेच बसवण्यात आले आहेत व बाकीचे ढापे जुनेच पण जरा बरे आहेत असे बसवलेले आहे खराब असलेले ढापे पेरणे गावच्या बाजूकडील नदीकाठावर मोठ्या प्रमाणात पडलेले असुन त्यांची अवस्था खराब आहे.भीमा नदीतील बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूने ढापे (लोखंडी गेट) बसवताना तेथील बाभळीची खोडे,झाडाच्या फांद्या व इतर मोठ्या प्रमाणावर साठलेला कचरा काढण्याची तसदी कर्मचाऱ्यांनी घेतली नाही,सदर कचरा तसाच ठेवल्याचे दिसत आहे.मोठ्या प्रमाणात खराब झालेले ढापे (लोखंडी गेट), बंधाऱ्याच्या मोरीच्या भिंतीतून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होऊन मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे. बंधाऱ्याच्या भिंतीची दुरावस्था खूप मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसत असून बंधारा दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सदर बंधारा हा पूर्णपणे खराब होण्या अगोदर पाट बंधारे विभागाने लवकरात लवकर दुरुस्त करून होणारे नुकसान टाळावे असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.बंधाऱ्यावर शेतकऱ्यांचे जीवन अवलंबून आहे कारण कोरेगाव भिमा , पेरणे गाव येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाचे व इतर पिके घेत असतात.जमिनीची सुपीकता,पुण्यासारखी बाजारपेठ,साखर कारखाने, गुळाची गुऱ्हाळे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने येथील शेतकरी मागणी तसा पुरवठा याचा अचूक अंदाज घेत पिके घेतात पण जर पिकाला पाणी नसेल करायचे काय ? असा भीतीदायक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये येऊ लागलाय आणि त्याचे कारण बंधाऱ्याची झालेली दुरावस्था आणि त्यातून होणारी पाणी गळती हे आहे.सादर बंधाऱ्याची दुरावस्था दाखवण्यासाठी स्थानिक शेतकरी रजेशसिंह ढेरंगे, अमीर इनामदार, दत्तात्रय भाऊसाहेब गव्हाणे, अशोक ढेरंगे, कोळी मामा यांनी याबाबत दुरुस्तीची मागणी केली आहे.

हा बंधारा जुना असून याद्वारे भीमा नदीचे पाणी अडवण्यास मदत होते,बऱ्याच वर्षांपासून बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे.बंधाऱ्याच्या साहित्य ठेवण्यासाठी राखीव ठेवलेली जमीन असून सुद्धा या बंधाऱ्याचे लोखंडी गंजलेले ढापे कुठेही अस्तव्यवस्त पडलेले आहेत.त्यामुळे बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याच्या कामाकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे.

-दशरथ वाळके,माजी उपाध्यक्ष-तंटामुक्ती समिती पेरणे.

“वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याची पाहणी करून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करून लवकरात लवकर बंधाऱ्यातून होणारी पाण्याची गळती, बंधाऱ्याच्या गळणाऱ्या मोऱ्या, बंधाऱ्यावर कठडा बांधण्यात यावा व बाजूस असणाऱ्या भिंतीचे काम लवकरात लवकर करण्यात यावे.”
     -राजेशसिंह ढेरंगे,स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना,कोरेगाव भीमा

“बंधाऱ्याच्या कामांबाबत आम्ही सतत चांगले प्रयत्न करत असतो शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची  गळती होत असून , बंधाऱ्याची दुरुस्ती होणे गरजेचे असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पुढील काम करण्यात येईल. ”
      -संजय थिटे,संबंधित बंधारा चौकीदार