चक्रीवादळाने आंबेगाव तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी  : गटनेते देविदास दरेकर

भिमाशंकर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गोहे खुर्द येथील पाच आदिवासी कुटुंबांच्या घराची निसर्ग चक्री वादळात मोठे नुकसान झाले आहे. तर इतर ठिकाणी शेतीचे, घरांचे, विद्युत मंडळाचे नुकसान

भिमाशंकर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गोहे खुर्द येथील पाच आदिवासी कुटुंबांच्या घराची निसर्ग चक्री वादळात मोठे नुकसान झाले आहे. तर इतर ठिकाणी शेतीचे, घरांचे, विद्युत मंडळाचे नुकसान झाले, चक्री वादळाने तालुक्यातील ज्या नागरीकांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करून त्यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेना गटनेते देविदास दरेकर यांनी केली आहे.

तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाने बहुसंख्य नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये गोहे खुर्द येथील जिजाबाई गाडेकर, भागुजी गाडेकर, लुमाजी गाडेकर, शांताबाई गाडेकर व संजय गाडेकर या पाच कुटुंबाचे चक्रीवादळामुळे घरांंचे नुकसान झाले आहे . तसेच जनावरांसाठी साठवून ठेवलेली वैरणही भिजली आहे.तर घोडेगाव येथे सह्याद्री धाबा जवळ एक वडाचे झाड मंचर भीमाशंकर रस्त्यावर एका चार चाकी गाडीवर पडले . पोलीस ठाण्याचे वाहन  पेट्रोलिंग करीत असताना भर पावसात व  वादळात घोडेगाव  पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस  निरीक्षक प्रदीप पवार ,पोलिस अमोल काळे ,स्वप्नील कानडे यांनी गाडीत अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले. त्यांनी हे झाड गाडीवरून दूर केले.

तसेच घोडेगाव , नारोडी , गिरवली परिसरातही पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे .त्यातही बराकीत साठवलेला कांदा , झाडावरील आंबे व शेतात उभी असलेली बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले. तर जोरदार सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळे आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला असून सुमारे ५०  टक्के  हुन अधिक आंबे जमिनीवर पडले . आणि अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली .नारोडी येथील चाफमळा परिसरात बाभळीचे झाड लाईट पोल वर पडल्यामुळे तीन पोल उन्मळून पडले.  तारा तुटल्या परंतु लाईट बंद असल्यामुळे मोठी  दुर्घटना घडली  नाही.