आंबिल ओढ्याच्या महापुराचा धोका कायम ; संरक्षक भिंतीचे काम अद्याप अपूर्ण

अर्धवट कामाला महापालिकेचे प्रशासनच जबाबदार महापुराने बाधित झालेले गुरुराज सोसायटीचे रस्ते व इतर कामे मार्गी लावली असली तरी संरक्षक भिंतीचे काम मात्र रेंगाळले आहे.शेजारीलएकासोसायटीच्यातीव्र विरोधामुळे हे काम अर्धवट राहिल्याचे सांगून पालिका प्रशासनाने यात हस्तक्षेप करून संरक्षक भिंतीचे काम करण्याची मागणी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी केली आहे.'

    धनकवडी : दोन वर्षापूर्वीच्या ऑबिल ओढा महापुराच्या आठवणी बुजलेल्या नसताना पद्यावती परिसरातील संरक्षक भिंतीच्या अर्धवट कामामुळे रहिवासी भीतीच्या सावटाखाली असून भितीचे काम तातडीने करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
    दोन वर्षांपूर्वी ऑबिल ओढयालगतच्या परिसराला महापुराच्या बसलेल्या भीषण तडाख्यात येथील सुमारे २० रहिवासी इमारतीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अपरिमित नुकसान झाले. येथील गुरुराज सोसायटीच्या जवळपास २० इमारतींचा तळमजला पाण्याखाली जाऊन ९५ सदनिका बाधित झालेल्या होत्या. सोसायटीची जवळपास तीनशे मीटर संरक्षक भिंत पडली होती. पुणे महापालिकेच्या वतीने तातडीने ओळयालगतची संरक्षक भिंत बांधून देण्याचे आश्वासन देकन नागरिकांना क्षणिक दिलासा दिला. मात्र दोन वर्षांत अवधी ५२ मीटर भिंत बांधण्यात आली. उर्वरित अडीचशे मीटर भिंतीचे काम अद्याप अपूर्णच राहिले आहे.
    येथील गुरुराज सोसायटीच्या माजी सचिव सुप्रिया महांबरे यांनी याबाबतीत बोलताना सांगितले की, गुरुराज सोसायटीच्या मितीचे काम रखडल्याने येथील १३ हजार रहिवासी चिंताग्रस्त आहेत. त्याचबरोबर या भागातील पद्मावतीलगत असलेल्या मोरे वसाहतीमधील पुलालगतच्या संरक्षक भिंतीचे काम झाले असले तरी भिंतीची उंची वाढविण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

    अर्धवट कामाला महापालिकेचे प्रशासनच जबाबदार महापुराने बाधित झालेले गुरुराज सोसायटीचे रस्ते व इतर कामे मार्गी लावली असली तरी संरक्षक भिंतीचे काम मात्र रेंगाळले आहे.शेजारीलएकासोसायटीच्यातीव्र विरोधामुळे हे काम अर्धवट राहिल्याचे सांगून पालिका प्रशासनाने यात हस्तक्षेप करून संरक्षक भिंतीचे काम करण्याची मागणी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी केली आहे.’