The health department will investigate; The Death Audit Committee will audit each death

कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव बारामती परिसरात दिसून येऊ लागला आहे. आतापर्यंत बारामतीमध्ये आजूबाजूच्या तालुक्या व जिल्ह्यांसहित म्युकर मायकोसिसच्या ३६ रूग्णांची उपचार घेतले आहे. त्यामध्ये ७ रूग्ण पुण्याला अन्य रूग्णांना बारामतीमध्ये उपचारानंतर घरी सोडण्यात आले. महिनाभरात बारामतीत म्युकरमायकोसिसच्या १९ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यापैैकी पुण्यात उपचारा घेत असलेले बारामतीतील दोन रूग्ण दगावले आहेत.

    बारामती : बारामती येथील महिलेचा मृत्यू म्युकरमायकोसिसमुुुळे झाला नसून कोरोनामुळे झाला असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने दिले ‌आहे.बारामती येथील एका कोरोनाबाधित महिला रूग्णावर उपचार सुरू असतानाच म्युकर मायकोसिसचा प्रादुर्भाव आढळून आला. दरम्यान या रूग्णावर म्युकरमायकोसिसआजारावर देखील आरोग्य प्रशासनाने कुटूंबियांच्या समंतीने यशस्वी शस्त्रक्रिया केली. उपचारादरम्यान या रूग्णाचा मृत्यू झाला. मात्र या रूग्णाचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले.

    कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव बारामती परिसरात दिसून येऊ लागला आहे. आतापर्यंत बारामतीमध्ये आजूबाजूच्या तालुका  व जिल्ह्यांसहित म्युकर मायकोसिसच्या ३६ रूग्णांची उपचार घेतले आहे. त्यामध्ये ७ रूग्ण पुण्याला अन्य रूग्णांना बारामतीमध्ये उपचारानंतर घरी सोडण्यात आले. महिनाभरात बारामतीत म्युकरमायकोसिसच्या १९ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यापैैकी पुण्यात उपचारा घेत असलेले बारामतीतील दोन रूग्ण दगावले आहेत. सबंधीत महिलेवर तीन दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. मात्र कोरोनोमुळे या रूग्णांची आॅक्सिजन पातळी ८० च्या खाली होती. बेशुद्ध अवस्थेतच कुटूंबियांच्या संमतीने म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया पार पडली. मात्र त्यानंतरच्या उपचारास प्रतिसाद न दिल्याने या महिला रूग्णाचा मृत्यू झाला.