जिम, रेस्टोरंट्स, मंदिरांचा  निर्णय  परिस्थितीचा बघूनच : सुप्रिया सुळे

पुणे :  काेराेनाचा धाेका अद्याप टळलेला नसुन, त्यामुळेच जिम ,रेस्टाॅरंट, मंदीरे खुले करण्याचा निर्णय परिस्थितीचा अभ्यास करूनच घ्यावा लागेल असे मत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी व्यक्त केले.

पुणे महापालिकेत बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या मतदार संघाच्या कामानिमित्त अधिकारी वर्गा सोबत बैठक आयोजित केली होती. त्यानंतर खासदार सुळे पत्रकारांशी बाेलत हाेत्या. राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येचा विचार करून सरकार निर्णय घेता आहे. पण मात्र त्याच दरम्यान पुणे शहराचा विचार करायचा झाल्यास, करोनाचा आलेख स्थिरावला आहे. मात्र धोका टळलेला नाही.  त्यामुळे जिम, रेस्टोरंट्स, मंदिरे खुली करण्याबाबत परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागेल. अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांना पुण्यात मंदिरे, रेस्टॉरंट खुली करण्याची योजना मागणी होत आहे. त्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.

प्रसार माध्यमांशी बोलताना अनेक विषयावर त्यांनी भूमिका मांडली. खासदार इम्तियाज जलील यांनी २ तारखेपासून मशीद खुल्या करणार असे विधान केले होते. त्यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मंदिरे, मशिदी उघडा अशी मागणी करण्याचा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. आज तारीख काय आहे, थोडा धीर धरा अशी सूचक प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.

माजी खासदार राजू शेट्टी हे बारामती मध्ये आंदोलन करीत आहे. त्यावर त्या म्हणाल्या की, राजू शेट्टी बारामतीत आंदोलन करतात हाच आमच्या सरकारमधील आणि आधीच्या सरकार मधील फरक आधीच्या सरकारमध्ये दपडपशाही होती राजू शेट्टी हे आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते आहेत. कुणालाही आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.अंतिम वर्षाच्या परिक्षा बाबत त्या म्हणाल्या की, अंतिम वर्ष परिक्षेबाबत मी सरकार बरोबर असून जी सरकारची भूमिका तीच माझी भूमिका आहे. तसेच आता हा विषय न्यायप्रविष्ट असून फक्त तारीख आणखी पुढे ढकलायला नको, अशी भूमिका त्यांनी मांडली.सुप्रिया सुळे यांच्या नागरिकत्ववर सुब्रमण्यम स्वामींना यांनी ट्विट केले. त्यावर त्या म्हणाल्या की, सिंगापूर नागरिकत्वविषयीची केस मी न्यायालयात जिंकले असून त्यामुळे ट्विट करणाऱ्या सुब्रमण्यम स्वामींनाच या बाबत विचारा, असे त्यांनी सांगितले.
 

सुशांत विषयात माझा फारसा अभ्यास नाही  
मागील तीन महिन्या पासून अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी अनेक नावे पुढे येत आहे. तपासावरून चर्चा केली जात आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सुशांत विषयात माझा फारसा अभ्यास नसल्याचे त्यांनी सांगितले.

परभणीतील घटनेचा निषेध 
परभणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर झालेला हल्ला दुर्दैवी आणि निषेधार्थ घटना आहे. या प्रकरणाची माहिती लवकरच समोर येईल अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी परभणी घटनेवर मांडली.

नवीन महापालिका करण्याचा निर्णय चर्चा करून घ्यावा 
पुणे शहराच्या आसपासच्या भागातील 23 गावे महापालिकेत घेण्याबाबत शहरातील विविध पक्ष संघटना आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी घेतला पाहिजे. अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी समाविष्ट गावामुळे प्रशासना वर कामाचा ताण वाढला आहे. त्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली