अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून केली लग्नाची मागणी; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

    पिंपरी : तरुणाने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून प्रेमाची आणि लग्नाची मागणी केली. मुलीने यासाठी नकार दिला असता तिला मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सप्टेंबर २०२० ते ९ जून २०२१ या कालावधीत देहूफाटा येथे घडला. दत्ता गोरखे वय (२०, रा. देहूफाटा, आळंदी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

    याबाबत पीडित मुलीच्या आईने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीचा सप्टेंबर २०२० पासून पाठलाग केला. तसेच तिच्याकडे प्रेमाची आणि लग्नाची मागणी केली. याबाबत फिर्यादी यांनी आरोपीला समजावून सांगितले असता आरोपीने फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी दिली. तसेच पीडित मुलीने आरोपीला प्रेमासाठी नकार दिला असता तिला देखील मारण्याची धमकी दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.