Two women died in an accident while talking on the phone on the flyover of Santacruz-Chembur Link Road

शहरातील एका नामांकित उपाहारगृहातील थाळीवर सूट देण्यात येणार आहे, अशी बतावणी भामट्याने महिलेकडे केली. थाळीची नोंदणी करण्यासाठी एक लिंक पाठवितो, असे चोरट्याने महिलेला सांगितले. चोरट्याने महिलेला पाठविलेल्या लिंकमधून त्यांची वैयक्तिक माहिती घेतली. महिलेला बोलण्यात गुंतवून चोरट्याने महिलेच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर त्याच माहितीच्या आधारे महिलेच्या बँक खात्यातून चोरट्याने 1 लाख 44 हजार 497 रुपये लंपास केले.

    पुणे : शहरातील एका नामांकित हॉटेलमधील थाळीवर सूट असल्याची बतावणी करत सायबर भामट्याने मगरपट्टा सिटी भागातील महिलेला तब्बल 1 लाख 44 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका 38 वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मगरपट्टा सिटी भागात राहायला आहेत. त्यांच्या मोबाईलवर भामट्याने संपर्क साधला.