धक्कादायक घटना! कुटुंबियांनी लग्नाला विरोध करताच प्रेमी युगुलाचं टोकाचं पाऊल

या प्रेमी युगुलाच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. सध्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं. चांगल्या पगाराच्या नोकरीला लागावं. समाजात नाव कमवावं. किंवा निदान एक चांगली व्यक्ती व्हावी, अशी प्रत्येक आई-वडिलांची अपेक्षा असते. दौंड तालुक्यातील आत्महत्या केलेल्या या युगुलाच्या कुटुंबियांच्या देखील अशाच काही अपेक्षा असतील.

    पुणे : दौंड तालुक्यातील पाटस येथील अल्पवयीन मुलगी आणि नानविज येथील 25 वर्षीय तरुण या दोघांनी एकत्र विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. त्या दोघांचं एकमेकांवर जीवापड प्रेम होतं. दोघांनी लग्न देखील करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्या कुटुंबियांना ते मान्य नव्हतं. त्यामुळे दोघांनी संतापात विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

    कुटुंबावर दु:खाचा डोंगर

    या प्रेमी युगुलाच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. सध्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं. चांगल्या पगाराच्या नोकरीला लागावं. समाजात नाव कमवावं. किंवा निदान एक चांगली व्यक्ती व्हावी, अशी प्रत्येक आई-वडिलांची अपेक्षा असते. दौंड तालुक्यातील आत्महत्या केलेल्या या युगुलाच्या कुटुंबियांच्या देखील अशाच काही अपेक्षा असतील.

    याशिवाय त्यांच्या चांगल्यासाठीच ते कदाचित लग्नाला विरोध करत असावीत. पण त्यांच्या कानावर अचानक दोघांच्या आत्महत्येची बातमी पडल्यावर त्या आई-वडिलांना केवढा मोठा धक्का बसला असेल याची कल्पनाही करता येणार नाही. या प्रेमी युगुलाला दुसरा काही पर्याय शोधता आला असता. पण त्यांनी त्याचा विचार न केल्याने दोघी कुटुंबांवर मोठं संकट ओढावलं आहे