मुलगी झाल्याने बापाला आला राग, आरोग्य कर्मचाऱ्याचे दगडाने फोडले डोकं

बारामती - बारामतीमध्ये दाम्पत्याला मुलगी झाल्याने संतप्त बापाने पत्निला रुग्णालयात शिवीगाळ केली. रुग्णालयात बापाने मोठा धिंगाणा घातला. मुलगी झाल्याचा राग अनावर न झाल्याने मद्यधूंद अवस्थेत

 बारामती – बारामतीमध्ये दाम्पत्याला मुलगी झाल्याने संतप्त बापाने पत्निला रुग्णालयात शिवीगाळ केली. रुग्णालयात बापाने मोठा धिंगाणा घातला. मुलगी झाल्याचा राग अनावर न झाल्याने मद्यधूंद अवस्थेत रुग्णालयात शिवीगाळ करत धिंगाणा घातला. रुग्णलायातील वस्तूंचे नुकसाने केले. त्याला आडवण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यावर युवकाने दगडाने हल्ला केला. 

दाम्पत्याला पहिला मुलगा आणि मुलगी आहे. पत्नीला मुलगी झाल्याने त्याला पतीला राग आला, आणि त्याने डॉक्टरांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रुग्णालयात धिंगाणा घालत असल्याने कर्मचारी अटकाव करण्यास गेला, संतप्त बापाने कर्मचाऱ्यावार दगडाने मारले यामुळे कर्मचारी गंभीर जखमी झाला. त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. हा हल्ल्यात त्याच्या डोळ्याला व डोक्याला दगड लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे. 

रुग्णालयाने पोलीसांत कळवल्यावर, पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि व्यक्तीस ताब्यात घेतले. आरोपीवर भा.द.वि. ३५३ ३३३ ५०४ ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.