अंधश्रद्धेतून बुवाबाजी करत सासऱ्याने विवाहितेला पाजले चक्क ‘याचे’ रक्त…

पती लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे माहिती असूनही सासू आणि सासऱ्याने त्याचे लग्न पीडित विवाहितेसोबत लावून फसवणूक केली. सासऱ्याने विवाहितेशी लगट करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला.

    पिंपरी: अंधश्रद्धेतून(f superstition) पती, सासू आणि सासऱ्याने (father-in-law)चक्क विवाहितेला कोंबडीचे रक्त पाजल्याचा धक्कादायक प्रकार भोसरीत उघडकीस आला आहे. एवढेच नाही, तर पती लैंगिकदृष्ट्या असक्षम असताना त्याचे लग्न लावून दिले. त्यानंतर सासऱ्याने विवाहितेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पती, सासू आणि सासऱ्याच्या विरोधात स्त्री अत्याचार, विनयभंग, जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार (Witchcraft Prevention Act)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पती (वय ३३), सासरा (वय ६२), सासू (वय ५३) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३० डिसेंबर २०१८ ते १९ जून २०२१ या कालावधीत घडला. आरोपींनी आपसात संगनमत करून रत्नागिरी येथे घर बांधण्यासाठी तसेच घरखर्चासाठी विवाहितेकडे पैशांची मागणी केली. विवाहितेवर बुवाबाजी करून तिला कोंबडीचे रक्त पाजले. सासऱ्याने विवाहितेशी लगट करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला. पतीकडे इंजिनिअरिंगची डिग्री असल्याचे लग्नावेळी सांगण्यात आले होते. मात्र, त्याचे डिग्री पर्यंतचे शिक्षण झालेले नाही. पती लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे माहिती असूनही सासू आणि सासऱ्याने त्याचे लग्न पीडित विवाहितेसोबत लावून फसवणूक केली. पतीच्या लैंगिक असक्षमतेबाबत विवाहितेने तिच्या आई, वडील व नातेवाईकांना सांगितले. त्या कारणावरून आरोपींनी विवाहितेला मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली.