कोरेगाव भीमामध्ये  पहिला कोरोना रुग्ण आढळला

शिक्रापूर : राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या मोठ्या लोकसंख्येच्या गावाने लॉकडाऊनचे नियम पाळत कोरोनाच्या संसर्गापासून बचाव केला होता. मात्र या गावात

शिक्रापूर : राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या मोठ्या लोकसंख्येच्या गावाने लॉकडाऊनचे नियम पाळत कोरोनाच्या संसर्गापासून बचाव केला होता. मात्र या गावात देखील कोरोनाचा शिरकाव झाला असून येथे पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. येथील  चेकपोस्ट सध्या असून  नसल्यासारख्या स्थितीत असल्याने  गावात कोरोना रुग्ण सापडल्याची चर्चा गावात सुरु आहे. या रुग्णामुळे गावात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

            कोरेगाव भीमा ता. शिरुर येथे १९ मार्च पासून ३६ दिवसांचा सर्वात मोठा लॉकडाऊन घेतल्याने पंचवीस ते तीस हजार लोकसंख्येच्या गावाला कोरोनापासुन संरक्षित ठेवण्यास कृती समितीला यापूर्वी यश आले होते. यातच गावातील हम रस्त्यावर तहसिलदार लैला शेख यांच्या आदेशामुळे सुरु झालेला शोभेचा चेकनाका असुन नसल्या सारखा दिसत होता. कोरेगाव भीमामध्ये संचारबंदीच्या काळातही आयो जाओ घर तुम्हारा अशीच परिस्थिती दिसून येत होती. गावात संचारबंदीच्या काळातही नागरिकांनी पोलीसांना कलम १४४ ची अंमलबजावणी करण्यासाठी वारंवार सुचना करुनही गांभीर्याने घेतले नाही. तर गावामध्ये मुंबई पुण्यासह इतर भागातुन तीनशे पेक्षा जास्त लोक खुले आम येत असुनही मोजक्याच लोकांना होम कॉरन्टाईन करण्यात आले आहे. गावात पंचक्रोशीतील आठ ते दहा गावातील नागरिक दररोज येत असल्याने गावात संचारबंदीचा फज्जा उडाला होता. तर आज २४ मे रोजी कोरेगावातील एका इसमाला श्वसनाचा त्रास झाल्याने कोरेगावातील एका खाजगी रुग्नालयात व त्यांनतर तेथून वाघोलीतील खाजगी रुग्नालयात अ‍ॅडमीट करण्यात आले होते. २६ तारखेस त्याला रुग्नालयातून सोडण्यात आले दरम्यान त्याचे स्वॅब घेण्यात आल्यानंतर त्यानंतर त्याचे कोरोनाची टेस्ट पॉझीटिव्ह आल्याने गावात खळबळ उडाली आहे. तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. विराज भंडलकर, आरोग्य परीवेक्षक जालिंदर मारणे व कर्मचाऱ्यांनी परिसरातील सर्व्हे करण्यास प्रारंभ केला असुन कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संगिता कांबळे, उपसरपंच प्रकाश ढेरंगे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी गाव निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली असुन कामगार तलाठी अश्विनी कोकाटे, पोलीस पाटिल मालन गव्हाणे यांनी परिसराची पाहणी करुन गावातील व्यवहार बंद ठेवण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या.