आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधित व्यक्तिचा पहिला बळी ..

भिमाशंकर: आंबेगाव तालुक्यामध्ये कोरोना बाधित व्यक्तिंपैकी नारोडी येथील ६१ वर्षीय व्यक्तिचा पहिलाच कोरोणामुळे यशवंतराव चव्हाण रूग्णालय पिंपरी येथे मृत्यु झाल्याने तालुक्यामध्ये नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी खबरदारी व सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नारोडी येथे ६१ वयाचा रूग्ण मुंबईहून २१ मे ला आठ जणांच्या कुटुंबासह आले होते. ३१ मे ला त्यांना त्रास होऊ लागल्याने पुणे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. दि. ३ रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर उपचारा दरम्यान तीन दिवसांतच (दि. ६) त्यांचा मृत्यु झाला. संबंधित कोरोना बाधित व्यक्तिच्या घरातील आठ व शेजारचे दोन असे दहा जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.      
आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र दिसुन येत आहे. आता पर्यंत कोरोनाचे ४३ रूग्ण सापडले असून ३६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत तर दहा रूग्णांना बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. प्रशासनाने तालुक्यात विविध सोळा ठिकाणी कन्टेनमेंट झोन जाहिर केले आहे. यामध्ये शिनोली, फदालेवाडी, घोडेगाव, नारोडी, पिंगळवाडी (लांडेवाडी), गिरवली, वडगाव काषिंबेग, साकोरे, मंचर, अवसरी बुदु्क, पारगाव, जवळे, पेठ, एकलहरे, वळती, निरगुडसर या गावात कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गावांतील रस्ते व परीसर सिल केले आहे. तर तेथील बाधित रूग्णांच्या संपर्कातील लोकांना तपासणीसाठी रूग्णालयात दाखल केले आहे. आरोग्य कर्मचारी व पोलीस यंत्रणा डोळयात तेल घालून काम करत आहे.   
दरम्यान नारोडी येथील ग्रामपंचायतीला  प्रशासनाने सुरक्षेसंदर्भात सुचना केलेल्या आहेत. प्रांत अधिकारी जितेंद्र डुडी, तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, हे सद्यपरिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.