पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा आजही तहकूब

पुणे : पुणे महापालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा आजही सत्ताधार्यांनी तहकूब केली. मागील ३ दिवसापासून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आक्रमक होत असल्याने भाजपने या सभा तहकूब करण्यासाठी जोरदार हालचाली केल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सभा घेण्याचे शासनाचे आदेश आहेत.

पुणे : पुणे महापालिकेची ( Pune Municipal Corporation )ऑनलाइन सर्वसाधारण सभा आजही सत्ताधार्यांनी तहकूब केली. मागील ३ दिवसापासून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आक्रमक होत असल्याने भाजपने या सभा तहकूब करण्यासाठी जोरदार हालचाली केल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सभा घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. प्रभारी महापौर सरस्वती शेंडगे यावेळी उपस्थित होत्या. विरोधक बोलत असतानाच ही सभा तातडीने सभागृह नेते धीरज घाटे यांनी तहकूबी मांडली. आता दिनांक २४ नोव्हेंबर २०२० रोजी सभा होणार आहे. विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी त्याला अनुमोदन दिले. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, काँग्रेसचे गतीने आबा बागुल, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यावेळी उपस्थित होते. पुणे शहरात मागील ७ ते ८ महिन्यांपासून कोरोनाचे संकट गंभीर झाले होते. ते आता आटोक्यात येत आहे. त्यामुळे पुढील महिन्यात ही सभा प्रत्यक्षात होण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे. उद्या अजित पवार यांची भेट होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी दिली. दरम्यान, ऑनलाइन सभेत सहभागी होणाऱ्या नगरसेवकांना बोलू देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, त्यांना बोलू दिले जात नाही. त्यामुळे प्रत्यक्षात सभा होण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनीही जोरदार प्रयत्न सुरू केले आहे.

-सभागृहात बरेच नगरसेवक बिना मास्क
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे सर्वसामान्य पुणेकरांना मास्क लावणे, सॅनिटायजर वापरणे, सोशल डिस्टनसिंग पाळणे, असे आवाहन करण्यात येत आहे. पण, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे बरेच नगरसेवक सभागृहात बिनामस्क सभागृहात वावरत असतात. विशेष म्हणजे पुणे महापालिकेचे १ बडे पदाधिकारी विनामस्क सातत्याने दिसून येतात. त्यांची वरिष्ठ नेत्यांकडून कानउघाडणी केली असल्याची माहिती मिळाली आहे.