मुलीने केले चक्क वडिलांना फसवून जमिनीचे खरेदीखत

शिरूर तालुक्यातील कासारी येथील खळबळजनक घटना शिक्रापूर : कासारी (ता. शिरूर) येथील जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतरण करून बनावट खरेदीखत केल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या असताना आता चक्क शिक्रापूर

शिरूर तालुक्यातील कासारी येथील खळबळजनक घटना
शिक्रापूर :
 कासारी (ता. शिरूर) येथील जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतरण करून बनावट खरेदीखत केल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या असताना आता चक्क शिक्रापूर येथे असलेल्या मॉल चालक मुलीनेच स्वतःच्या वडिलांना फसवून जमिनीचे खरेदीखत केले असल्याची माहिती समोर आली असून याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली आहे.
कासारी (ता. शिरूर) येथील किसन भूमकर यांच्या नावे जमीन गट नंबर १२६४ मध्ये ४६ आर क्षेत्र असून सदर जमीन किसन भूमकर व त्यांची मुले करतात, मार्च २०२० मध्ये भूमकर यांची मुलगी व जावई यांनी भूमकर यांना आपल्याला तळेगाव ढमढेरे येथे कर्ज काढण्यासाठी जायचे आहे असे सांगून नेले आणि तेथे गेलेवर कोणताही कागद भूमकर यांना वाचण्यासाठी न देता कागदावर अंगठा घेतला. किसन भूमकर यांना संशय आल्याने त्यांनी घडलेला प्रकार त्यांच्या मुलांना सांगितला म्हणून किसन यांच्या नातवांनी १५ जून रोजी तळेगाव ढमढेरे येथील दस्त नोंदणी कार्यालयातून याबाबत दस्त काढला असता भूमकर यांची मुलगी व जावई यांनी भूमकर यांना फसवून त्यांच्या जमिनीचे खरेदीखत करून त्यामध्ये ५६ लाख रुपये रक्कम दाखवली असून भूमकर यांना कोणतीही रक्कम न देता फसवून खरेदीखत केल्याचे समोर आले. याबाबत मुलगी व जावई यांच्या घरी जाऊन विचारणा करण्यासाठी भूमकर हे गेले असताना त्यांनी आम्ही हे केले आहे, तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही भीत नाही अशी धमकी दिली. यांनतर किसन गंगाराम भूमकर रा. कासारी (ता. शिरूर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मुलगी व जावई यांच्या विरोधात फसवणूक केल्याबाबत तक्रार देत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
– तक्रारीची चौकशी करून गुन्हा दाखल करू – राजेश माळी
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फसवणूक करून जमिनीचे खरेदीखत केल्याच्या तक्रारी बाबत पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांच्याशी चर्चा केली असता, सदर प्रकार फसवणुकीचा असून त्या तक्रारीची चौकशी करून वरिष्ठ कार्यालयास माहिती पाठवून वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी घेऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी सांगितले.