मुलीनेच आईच व्हाट्सअप हॅक केलं; आईच्या प्रेमाची माहिती मिळताच त्याला मित्रांकरवी मागितली १५ लाख रुपयांची खंडणीची

महिलेच्या मुलीला संशय आल्याने तिने आईचे व्हाट्सअपच हॅक केले. त्यावेळी तिला तक्रारदार व त्यांच्यातील काही गोष्टी समजल्या. तर फोटो आणि व्हिडीओ देखील मिळाले. मग मुलीने अद्दल घडवण्यासाठी तिच्या मित्राला हे फोटो पाठवले. त्यानंतर या खरणीचा प्रकार सुरू झाला.

    पुणे: आईचंच व्हाट्सअप मुलीन हॅक करून तिचे प्रेम संबंध उघडकीस आणले आहेत. आईच्या त्या मित्राला मुलीने व तिच्या मित्रांनी ब्लॅक मेल करत १५ लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. हा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघड करत दोघांना १ लाख रुपयांची खंडणी घेताना पकडले आहे.
    मिथुन मोहन गायकवाड (वय २९) आणि करणं खुडे यांना पकडले आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे एका ओळखीतील महिलेशी प्रेम संबंध होते. महिलेच्या मुलीला संशय आल्याने तिने आईचे व्हाट्सअपच हॅक केले. त्यावेळी तिला तक्रारदार व त्यांच्यातील काही गोष्टी समजल्या. तर फोटो आणि व्हिडीओ देखील मिळाले. मग मुलीने अद्दल घडवण्यासाठी तिच्या मित्राला हे फोटो पाठवले. त्यानंतर या खरणीचा प्रकार सुरू झाला.

    आरोपींनी तक्रारदार याला मैत्रिणीचे फोटो आणि व्हिडीओ दाखविले व ते तुझ्या कुटुंबाला दाखवू अशी धमकी दिली. तर सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. याबाबत त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. खंडणी विरोधी पथक एकने या दोघांना मध्यवस्तीत तक्रारदार यांच्याकडून १ लाख रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडले. दोघांना अटक केली आहे.