मुलीनेच आईचं WhatsApp हॅक केलं; आईच्या प्रेमाची माहिती मिळताच मित्रांच्या मदतीने मागितली 15 लाख रुपयांची खंडणी

आईचंच व्हाट्सअॅप मुलीन हॅक करून प्रेम संबंध उघडकीस आणत सर्व माहिती मित्रांना पाठवून त्याला ब्लॅक मेल करत 15 लाख रुपयांची खंडणी मागण्यास संगीतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 1 लाख रुपयांची खंडणी घेताना दोघांना अटक केली आहे.

    पुणे : आईचंच व्हाट्सअॅप मुलीन हॅक करून प्रेम संबंध उघडकीस आणत सर्व माहिती मित्रांना पाठवून त्याला ब्लॅक मेल करत 15 लाख रुपयांची खंडणी मागण्यास संगीतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 1 लाख रुपयांची खंडणी घेताना या दोघांना अटक केली आहे. मिथुन मोहन गायकवाड (वय 29) आणि करणं खुडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे एका ओळखीतील महिलेशी प्रेम संबंध होते. महिलेच्या मुलीला संशय आल्याने तिने आईचे व्हाट्सअॅपच हॅक केले. त्यावेळी तिला तक्रारदार व त्यांच्यातील काही गिष्टी समजल्या. तर फोटो आणि व्हिडीओ देखील मिळाले. मग मुलीने अद्दल घडवण्यासाठी तिच्या मित्राला हे फोटो पाठवले. त्यानंतर खंडणीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

    दरम्यान आरोपींनी तक्रारदार याला मैत्रिणीचे फोटो आणि व्हिडीओ दाखविले व ते तुझ्या कुटुंबाला दाखवू अशी धमकी दिली. तर सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 15 लाख रुपयांची खंडणी मागितली. याबाबत त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. खंडणी विरोधी पथक एकने या दोघांना मध्यवस्तीत तक्रारदार यांच्याकडून 1 लाख रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडले. दोघांना अटक केली आहे.