…..  अन ढिगाऱ्याखाली अडकलेली मुलगी सुखरूप बाहेर आली ; घटना जाणून व्हाल थक्क !!!

आशु ही अंघोळ करत असताना इमारतीचा स्लॅब कोसळला. मात्र, याच दरम्यान ती कपाटाच्यामध्ये अडकली. यावेळी नेमके कुटुंबातील मुलगी, लहान बहीण, आई-वडील या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांचं पथक घटनास्थळी दाखल झाले. मुलीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

    पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात घराचा स्लॅब कोसळल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १५ वर्षीय मुलीला सुखरूप पणे बाहेर काढण्याता अग्नीशामक दलाला यश आले आहे. घटनेनंतर काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखालून मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलीचे नाव पौर्णिमा उर्फ आशु संभाजी मडके (वय १५) आहे.

    फुगेवाडी येथील स्टार स्पोर्ट्स चौकात अक्षय अशोक देवकर यांच्या मालकीच्या घरात शासकीय कर्मचारी संभाजी मडके आपल्या कुटुंबासह राहतात. मात्र, शनिवारी वडील, आई,आणि बहीण कामाला गेेल्यानंंतर आशु ही अंघोळ करत असताना इमारतीचा स्लॅब कोसळला. मात्र, याच दरम्यान ती कपाटाच्यामध्ये अडकली. यावेळी नेमके कुटुंबातील मुलगी, लहान बहीण, आई-वडील या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांचं पथक घटनास्थळी दाखल झाले. मुलीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अनेक अडचणींचा सामना करत आणि काही तासांच्या प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १५ वर्षीय मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले.