पोलीस अधिकाऱ्यानेच केला तरुणीवर बलात्कार

आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून पीडिताला पुणे आणि परिसरातील विविध ठिकाणी नेत तिच्यार वारंवार बलात्कार केला.

    पुणे:  शहरात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच कोथरुडमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानेच २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी, बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

    पीडित तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात आरोपी पीएसआयविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. प्रवीण नागेश जर्दे असे आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून तो पीएसआय पदावर कार्यरत आहेत. सध्या, येरवाडा पोलीस वाहतूक विभागात पोलीस उपनिरीक्षकपदी तो कार्यरत आहे. आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून पीडिताला पुणे आणि परिसरातील विविध ठिकाणी नेत तिच्यार वारंवार बलात्कार केला. तसेच, आपले पहिले लग्न झाल्याचेही आरोपीने लपवून ठेवल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पीडिताने लग्नाची मागणी केल्यावर तिला टाळाटाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

    लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने बलात्कार केला. त्यानंतर, पोलीस खात्याचा धाक दाखवत माझं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही, असे म्हणत फिर्यादी तरुणीलाच जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. याप्रकरणी कोथरुड पोलीस अधिक तपास करत आहेत.