स्वतःच्या ताटातील एक घास दुसऱ्याला देण्याची वृत्ती खरी संस्कृती  : आमदार अतुल बेनके

ओतूर : कोरोनाची जागतिक महामारी असतानाही स्वतःच्या ताटातील एक घास दुसऱ्याला देण्याची वृत्ती खरी संस्कृती आहे.देणारा हा नेहमीच मोठा असतो अशा आशयाचे उद्गार जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी

ओतूर : कोरोनाची जागतिक महामारी असतानाही स्वतःच्या ताटातील एक घास दुसऱ्याला देण्याची वृत्ती खरी संस्कृती आहे.देणारा हा नेहमीच मोठा असतो अशा आशयाचे उद्गार जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी ओतूर(ता.जुन्नर)येथे काढले.

 
ग्राम विकास मंडळ ओतूरच्या चैतन्य विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी शिवनेरी पेट्रोल पंपचे मालक प्रसिद्ध उद्योजक सुधाकर डुंबरे व डॉ.रमेश डुंबरे या बंधूंनी वडील कै. सोन्याबापू डुंबरे यांचे स्मरणार्थ पाच लाख रुपयांची देणगी जुन्नरचे आमदार अतूल बेनके व ओतूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक परशूराम कांबळे,जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले,जुन्नरचे सभापती विशाल तांबे आणि ओतूरचे सरपंच संतोष तांबे यांच्या उपस्थितीत ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे यांच्याकडे सुपूर्द केली.
 
याप्रसंगी सुधाकर डुंबरे म्हणाले,  देशात शिस्तीचा व स्वच्छतेचा प्रसार होणे गरजेचे आहे.याची सुरुवात शालेय जीवनापासूनच होणे गरजेचे आहे.ज्याच्याकडे आहे त्याने समाजाकरिता दिले पाहिजे.शाळेमुळेच आपण मोठे आहोत.सामाजिक बांधिलकी सर्वांनी जोपासली पाहिजे.आपल्या संस्कृतीचे रक्षण,शिस्त व स्वच्छता यामुळे आपण अग्रगण्य राहू शकतो.विद्यालयाच्या नूतन इमारतीसाठी पाच लाख रुपयाची देणगी देताना मनस्वी आनंद होत आहे व कृतकृत्य झाल्यासारखे वाटते असेही ते म्हणाले.
 
यावेळी उपसरपंच डॉ.सुनिता वेताळ, बाळासाहेब घुले,भरत अवचट,स्मिता डुंबरे, जालंदर पानसरे,महेंद्र पानसरे,प्रभाकर तांबे, रघूनाथ तांबे,राजेंद्र डुंबरे,प्रदीप गाढवे, पंकज घोलप,प्रशांत डुंबरे,वसंत पानसरे,शरद माळवे,राजाराम शिंदे सोशल डिस्टंन्सिंग ठेवुन उपस्थित होते. 
 
हा कार्यक्रम सोशल डिस्टसिंग नियमांचे पालन करुन आयोजित करण्यात आला होता. प्रास्ताविक ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे व सूत्रसंचलन भाऊसाहेब खाडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे यांनी मानले.