धक्कादायक ! वृध्देच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या पळवल्या

पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार चंद्रभागा या कात्रज ते सारोळे बसमधून प्रवास करताना त्यांच्या शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातातील ६८ हजार रूपये किंमतीची पाटल्य काढून घेतली.

    भोर : कात्रज,पुणे ते सारोळा पीएमपीएल बसमधून प्रवास करणाऱ्या वृध्द महीलेच्या हातातील सोन्याची बांगडी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा गुन्हा राजगड पोलीसांनी शनिवारी दाखल केला. या प्रकरणी चंद्रभागा ज्ञानोबा कदम (वय-७८) रा. बाबर डेअरीसमोर, कात्रज,पुणे यांनी फिर्याद दिली. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार चंद्रभागा या कात्रज ते सारोळे बसमधून प्रवास करताना त्यांच्या शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातातील ६८ हजार रूपये किंमतीची पाटली काढून घेतली. त्यांच्या हातात सहा पाटल्या होत्या. कात्रज ते कोंढणपूर दरम्यान ही चोरी झाली.हवालदार बी.एस.कालेकर पुढील तपास करीत आहेत.