किराणा भुसार मालाचा बाजार साेमवारपासून पुन्हा सुरू हाेणार

पुणे : मार्केटयार्ड येथील किराणा भुसार मालाचा बाजार साेमवारपासून पुन्हा सुरू हाेणार आहे. व्यापाऱ्यांनी व्यवसाय करताना काेराेनाचा प्रसार हाेऊ नये याकरीता काळजी घ्यावी असे आवाहन दि पुना मर्चंट्स

पुणे : मार्केटयार्ड येथील किराणा  भुसार मालाचा बाजार साेमवारपासून पुन्हा सुरू हाेणार आहे. व्यापाऱ्यांनी व्यवसाय करताना काेराेनाचा प्रसार हाेऊ नये याकरीता काळजी घ्यावी असे आवाहन दि पुना मर्चंट्स चेंबरने केले आहे.

चेंबरचे अध्यक्ष पाेपटलाल अाेस्तवाल यांनी पत्रकार परीषदेत ही माहीती िदली. यावेळी माजी अध्यक्ष प्रवीण चाेरबेले, अशाेक लाेढा, िवजय मुथा, अनिल लुंकड अािण जवाहरलाल बाेथरा हे पदाधिकारी उपस्थित हाेते.

काेराेनाच्या पार्श्वभुमीवर सुरू असलेल्या लाॅकडाऊनच्या कालावधीत पुण्यातील िकराणा भुसार मालाचा घाऊक बाजार सुरू हाेता. या बाजारातील पंधरा व्यापाऱ्यांना काेराेनाचा संसर्ग झाल्याचे गेल्या अाठवड्यात स्पष्ट झाले. यातील दाेन व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला अाहे. यामुळे संपूर्ण बाजार पेठेत गुळ भूसार विभागात भीतीचे वातावरण पसरले होते. या पार्श्वभूमीवर दि पूना मर्चंटस चेंबरने ५ दिवस बाजार बंद ठेवण्याचा िनर्णय घेतला हाेता.  याबाबत पणन संचालक सुनिल पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक  बी. जे. देशमुख यांच्याबरोबर संयुक्तीक बैठक झाली. यामध्ये मार्केट यार्ड मध्ये विविध सुविधांविषयी चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण मार्केट यार्ड निर्जंतुकीकरण, थर्मल गन, सॅनिटायझरींग, बाधित परिसरातून येणाऱ्या लोकांना प्रतिबंध करणे याविषयावर चर्चा झाली. याप्रमाणे बाजार समितीने सर्व कामे केली असल्याचे आमच्या निदर्शनास आले. तसेच जिल्हाधिकारी  नवलकिशोर राम , बाजार समितीचे प्रशासक  देशमुख यांच्याबराेबर बैठक झाली. या बैठकीत बाजार पुन्हा सुरू करण्यािवषयी अािण तेथे काेराेनाचा प्रसार राेखण्याकरीता करण्याच्या उपाययाेजनांवर चर्चा झाली.

चेंबरच्या कार्यकारी मंडळाची शनिवारी  बैठक झाली. या बैठकीत साेमवारपासून पुन्हा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात अाला. २५ मेपासून हा िवभाग सकाळी दहा ते सांयकाळी पाच यावेळेत सुरू राहील असे अाेस्तवाल म्हणाले. व्यापाऱ्यांनी दुकाना थर्मल गन ठेवावी,  सॅनिटायझरचा वापर करणे,  जास्तीजास्त व्यवहार हा डिजीटल पध्दतीने करावा,  सोशल डिस्टंस ठेवणे अशा सूचना करण्यात अाल्या अाहेत.