महानगरपालिकेचे आरोग्य विभागप्रमुख डॉ. आशिष भारती यांना कोरोनाचा संसर्ग

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुखपदी डॉ. रामचंद्र हंकारे यांचा प्रतिनियुक्ती कालावधी संपल्यानंतर ३० सप्टेंबर २०२० रोजी पुढील एक वर्षांसाठी डॉ. आशिष भारती यांची नियुक्ती करण्यात आली होती. याअगोदर भारती यांनी आरोग्य सेवा ( कुटुंब कल्याण) सहाय्यक संचालक म्हणून सहा वर्षे कार्यरत होते.

    पुणे: मागील काही दिवसांपासून पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. बु. त्यामुळे पुण्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागप्रमुख डॉ. आशिष भारती यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागप्रमुख म्हणून डॉ. आशिष भारती यांनी जबाबदारी स्वीकारली होती. तसेच त्यांनी पालिका आणि खासगी रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला होता.
    पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुखपदी डॉ. रामचंद्र हंकारे यांचा प्रतिनियुक्ती कालावधी संपल्यानंतर ३० सप्टेंबर २०२० रोजी पुढील एक वर्षांसाठी डॉ. आशिष भारती यांची नियुक्ती करण्यात आली होती. याअगोदर भारती यांनी आरोग्य सेवा ( कुटुंब कल्याण) सहाय्यक संचालक म्हणून सहा वर्षे कार्यरत होते. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. कोरोनाच्या सुरूवातीपासुन सौरभ राव हे कोरोनाच्या संपुर्ण प्रक्रियेत कायम अग्रभागी राहिले होते. महापालिकेबरोबर वेगवेगळ्या भागांत प्रतिबंधित क्षेत्र करणे असो की कशा पद्धितीने नियमांची अंमलबजावणी करायची हे ठरवणे असो ते कायमच थेट या भागांना भेटी देत पाहणी करत नियोजन करत होते.