रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने आरोग्य विभागाने गाफील राहू नये

मंचर : आंबेगाव तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होवु लागल्याने आरोग्य विभागाने गाफील राहु नये. महासर्वे करुन निघणारे कोरोनाबाधित रुग्ण यांच्यावर तातडीने उपचार सुरु केले पाहिजे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवुन त्यांना गृह विलगीकरण करण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे,असे आवाहन कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी केले.

-रुग्णांना उत्तम सेवा द्यावी
अवसरी फाटा (ता.आंबेगाव) येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात कोरोना आढावा बैठक मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा,मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णु िहंगे,पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, प्रांतअधिकारी सारंग कोडोलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे,तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अंबादास देवमाने, डॉ. प्रताप िचंचोलीकर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे,अवसरी कोविड सेंटरच्या व्यवस्थापिका डॉ.सीमा देशमुख, पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे,सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदिप पवार,भीमाशंकर हॉस्पिटलचे विश्वस्त डॉ. श्रीरंग फडतरे उपस्थित होते. तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोनाचा महासर्वे सुरु झाल्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने कमी होवु लागली आहे. असे सांगुन मंत्री वळसे पाटील म्हणाले खाजगी रुग्णालयात कोविड उपचार सुरु झाल्यामुळे शासकीय कोविड केअर व उपचार केंद्रावरील ताण कमी झाला आहे. परंतु सरकारी यंत्रणेने गाफील न राहता येणाऱ्या रुग्णांना उत्तम सेवा द्यावी.