मानधन प्राप्त कुस्तीगिरांनी मानधनासाठी संपर्क साधण्याचे कार्यालयाचे आवाहन अहमदनगर: जिल्ह्यातील २०१९-२० या वर्षासाठी कुस्तीगीरांचे सहा महिन्याचे व वर्ष भराचे सुमारे साडेतीन लाख रुपयाचे मानधन क्रीडा व

मानधन प्राप्त कुस्तीगिरांनी मानधनासाठी संपर्क साधण्याचे कार्यालयाचे आवाहन

अहमदनगर: जिल्ह्यातील २०१९-२० या वर्षासाठी कुस्तीगीरांचे सहा महिन्याचे व वर्ष भराचे सुमारे साडेतीन लाख रुपयाचे मानधन क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने जिल्हा क्रीडा कार्यालयास अदा करण्यात आले आहे. कुस्तीगीरांनी जिल्हा क्रीडा कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार तथा संघ व्यवस्थापक पै.नाना डोंगरे व तांत्रिक सचिव पै.हंगेश्‍वर धायगुडे यांनी केले आहे.

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा गादी व माती विभागातील प्राविण्यधारक कुस्तीगीर-वैभव डेंगाळे, आकाश भिंगारे, सागर मोहोळकर, विकास गोरे, केवल भिंगारे, अक्षय कावरे, सचिन मुरकुटे, शुभम लांडगे, सौरभ शिंदे, संदीप लटके, प्रतिक्षा परहर, ६३ वी वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी किताब लढत २०१९-२० माती विभाग- आदर्श रामकट, आकाश सोनटक्के, विकास तोरडमल, किरण नलवडे, अजित शेळके, आण्णा गायकवाड, सुरेश पालवे, ६३ वी वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी किताब लढत २०१९-२० गादी विभाग- ओंकार मरकुटे, ऋषीकेश शेळके, स्वप्निल भुजबळ, विकास सासवडे, केवल भिंगारे, ऋषीकेश लांडे, अनिल ब्राम्हणे, विष्णू खोसे, ४२ वी कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा २०१९-२०- मयुर तांबे, सचिन शिंदे, गणेश शेठे, गोविंद बेडके, किरण गव्हाणे, अभिराज थेटे या कुस्तीगारांसाठी मानधन जिल्हा क्रीडा कार्याल यास अदा करण्यात आलेले आहे.