अपघातात लोखंडी रॉड शरीरातून झाला आरपार

वाघोली : (ता. हवेली) पुणे-नगर महामार्गावर वाघोलीत सुरु असलेल्या सहापदरीकरणाच्या कामामध्ये पत्रे लावण्यासाठी उभारलेल्या लोखंडी सांगाड्याला दुचाकीवरील एका व्यक्तीची धडक बसून लोखंडी रोड व्यक्तीच्या उजव्या खांद्याकडील बाजूला शरीरातून आरपार झाल्याची घटना गुरुवारी (दि.२५) रात्री ९.३० च्या सुमारास कावेरी हॉटेल सामोरील बाजूस घडली.

 नगर महामार्गावरील वाघोलीतील घटना; पीडब्लूडीचे दुर्लक्ष व ठेकेदाराच्या गलथानपणामुळे अपघात

 
वाघोली : (ता. हवेली) पुणे-नगर महामार्गावर वाघोलीत सुरु असलेल्या सहापदरीकरणाच्या कामामध्ये पत्रे लावण्यासाठी उभारलेल्या लोखंडी सांगाड्याला दुचाकीवरील एका व्यक्तीची धडक बसून लोखंडी रोड व्यक्तीच्या उजव्या खांद्याकडील बाजूला शरीरातून आरपार झाल्याची घटना गुरुवारी (दि.२५) रात्री ९.३० च्या सुमारास कावेरी हॉटेल सामोरील बाजूस घडली. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीस स्थानिक तरुणांनी रॉडचा काही भाग कापून त्याच अवस्थेमध्ये पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलविले. सहापदरीकरणाचे काम करीत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदाराच्या चुकांकडे दुर्लक्ष करीत आहे तर ठेकेदार कामामध्ये गलथानपणा करीत असल्याने अपघात घडत असल्याच्या प्रतिक्रिया वाघोली ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.