पिंपळे सौदागर येथील जर्वरी रस्त्याचा प्रश्न अखेर सुटला ; शत्रुघ्न काटे आणि निर्मला कुटे यांच्या पाठपुराव्याला यश

स्त्याचे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी जागा मालक व संबंधित शेतकरी वर्ग यांच्याशी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या माध्यमातून वारंवार बोलणी सुरू होती. या जागा मालकांना त्यांच्या जागेचा योग्य तो मोबदला मिळावा या प्रामाणिक हेतुने नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महापालिका आयुक्त व नगररचना विभागातील आधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली.

पिंपरी:पिंपरी चिंचवड़ मधील पिंपळे सौदागर येथील पी.के. चौक ते कुंजीर चौक दरम्यानच्या जर्वरी रोड नावाने प्रसिद्ध असलेल्या रस्त्याच्या प्रलंबित कामाचा प्रश्न स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापु काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांनी पालिका प्रशासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर मार्गी लागला आहे.

गेली १० वर्षापासून या रस्त्याचे काम रखडले होते. सदर रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी जागा मालक व संबंधित शेतकरी वर्ग यांच्याशी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या माध्यमातून वारंवार बोलणी सुरू होती. या जागा मालकांना त्यांच्या जागेचा योग्य तो मोबदला मिळावा या प्रामाणिक हेतुने नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महापालिका आयुक्त व नगररचना विभागातील आधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली.

या बैठकीत सदर ठिकाणच्या जागा मालकांना देण्यात येणारा टीडीआर स्वरुपातील मोबदला मंजुर करण्यात आला. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या महापालिका प्रशासनाकडे सुरू असलेल्या पाठपुराव्याला यामुळे यश मिळाले आहे. गुरुवारी (दि.१७ डिसेंबर) रोजी सदर रस्त्याच्या जागा मालकांसमवेत बोलणी करून त्यांच्या उपस्थितीत रस्त्यास अडथळा ठरत असलेले बांधकाम हटविण्यात आले. त्यामुळे येथील १८ मीटरचा पक्का रस्ता लवकरच पुर्ण होईल