धक्कादायक! शिवीगाळ करण्यास रोखल्याने चाकूने  भोकसले

पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. राहुल सिद्धुधम रोकडे (वय २६, रा. ज्ञानेश्वर पार्क, दिघी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पिंपरी: घरासमोर शिवीगाळ करत असलेल्या तरुणाला ‘शिवीगाळ करू नको’ म्हटल्याने तरुणाने एकाचा चाकुने भोकसून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास दिघी येथील ज्ञानेश्वर पार्क येथे घडली. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. राहुल सिद्धुधम रोकडे (वय २६, रा. ज्ञानेश्वर पार्क, दिघी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तुकाराम सोनू भालचीम (वय ३६, रा. ज्ञानेश्वर पार्क, दिघी) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भालचिम यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास आरोपी राहुल फिर्यादी भालचिम यांच्या घराजवळ शिवीगाळ करत होता. त्यामुळे भालचिम यांनी त्याला ‘शिवीगाळ करू नको आम्हाला त्रास होतो’ असे म्हटले. यावरून राहुल याने भालचिम यांच्या पोटात चाकूने भोकसून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी राहुल याला अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.