लॉकडाऊनमुळे शहरातील इतर गुन्ह्याचे प्रमाण घटले ; मात्र खुनाच्या ७९ घटनांची नोंद

लॉकडाऊनमुळे शहरातील संपूर्ण व्यवहार बंद होते. नागरिक घरात बंदिस्त झाले होते. २४ तास रस्त्यावर पोलीस व नागरिक घरात यामुळे चोरी, घरफोडी, वाहन चोरी यासारखे मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे.

    पुणे: कोरोनाकाळात शहरात असलेल्या लॉकडाऊनमुळे गुन्हेगारीचे प्रमाण बरेच कमी झाले होते. नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोने(National Crime Records Bureau) नुकताच २०२० चा गुन्हेविषयक अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार अनेक घटकांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये मागील दोन वर्षांपासून घट झालेली दिसून आलेली आहे. यामध्ये २०१८मध्ये १४८१ गुन्हे घडले होते. त्यानंतर २०१९ मध्ये १३९० आणि २०२० मध्ये १०५५ महिलांविषयक गुन्हे दाखल झाले होते.  तर पुणे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण घटले असले तरी मागील तीन वर्षांच्या तुलनेत खूनाचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे. २०२० मध्ये शहरात एकूण ७९ खूनाच्या घटना समोर आल्या आहेत.

    २०२० मधील पुण्यातील गुन्हे

    खून – ७९

    खुनाचा प्रयत्न – ११९

    अपहरण – ४३५

    जबरी चोरी – ७६

    बलात्कार ६२

    महिलांचा छळ – २५२

    मुलांबाबतचे गुन्हे – २१७

    महिलांचा विनयभंग – १३४

    माहिती तंत्रज्ञान गुन्हे – ९०

    विश्वासघात/फसवणूक – ४०४

    लॉकडाऊनमुळे शहरातील संपूर्ण व्यवहार बंद होते. नागरिक घरात बंदिस्त झाले होते. २४ तास रस्त्यावर पोलीस व नागरिक घरात यामुळे चोरी, घरफोडी, वाहन चोरी यासारखे मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे.