लिनिअर गार्डनच्या देखभालीवर महिन्याकाठी साडेचार लाखांचा खर्च

देखभाल आणि संरक्षणकामी निविदा प्रसिध्द करण्यात आली होती.ही निविदा काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या उद्यानाच्या देखभालीचे काम करण्यासाठी कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे निविदा कार्यवाही पूर्ण होईपर्यंत ३ महिने अथवा निविदा कार्यवाही पुर्ण होईपर्यंत हे काम मेसर्स गार्डन गुरुज फार्म अँन्ड नर्सरी यांना देण्यात येणार आहे.

    पिंपरी : मौजे पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते काटे पाटील चौकापर्यंत उच्चक्षमता द्रुतगती मार्गाच्या क्षेत्रामध्ये जॉगिंग ट्रॅक, वृक्षारोपण (लिनिअरर्बन गार्डन) देखभाल करण्यासाठी उद्यान विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. देखभाल आणि संरक्षणकामी निविदा प्रसिध्द करण्यात आली होती.ही निविदा काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या उद्यानाच्या देखभालीचे काम करण्यासाठी कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे निविदा कार्यवाही पूर्ण होईपर्यंत ३ महिने अथवा निविदा कार्यवाही पुर्ण होईपर्यंत हे काम मेसर्स गार्डन गुरुज फार्म अँन्ड नर्सरी यांना देण्यात येणार आहे.

    ह्या उद्यानाची देखभाल आणि संरक्षणकामी ४२ हजार ७६० चौरस मीटर (उद्यान क्षेत्र ३२ हजार ७९२ चौरस मीटर) ९ हजार २१९ चौरस मीटर क्षेत्रावर गेजबो, प्लाझा, एरीया,पाथवे,स्वच्छतागृह, साफसफाई करण्यासाठी २ मजुर कर्मचारी आवश्यक आहेत. यासाठी ४ लाख ३७ हजार ५७० इतका खर्च येणार आहे. मेसर्स न्यु गार्डन गुरुज फार्म अँन्ड नर्सरी यांनी हे कामकाज करण्यासाठी तयार असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. त्यानुसार ३ महिने कालावधीसाठी येणाNया अथवा निविदा कार्यवाही पूर्ण होईपर्यंतच्या येणाNया प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीची मान्यता घेतली जाणार आहे.