marriage

प्रशांत व पिडीत तरूणीची फेसबुकवरून ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रित झाले व मैत्रिची रूपांतर प्रेमात. त्यानंतर गेली तीन ते चार वर्ष दोघेही प्रेमात होते. त्यांना विवाह देखील करायचा होता. तरूणीच्या कुटूंबाने विवाहाला परवाणगी दिली होती. मात्र, प्रशांतच्या कुटूंबाचा या विवाहाला विरोध होता. तरूणी खालच्या जातीची असल्याने हा विरोध होता. त्यातच प्रशांतने कुटूंबाच्या सांगण्यावरून दुसऱ्याच मुलीशी विवाह केला. त्यानंतर या तरूणीने प्रशांतची संपर्क बंद केला.

    पुणे : प्रियसीच्या जातीवरून कुटूंबियांनी विरोध केल्यानंतर प्रियकराने दुसऱ्या मुलीशी विवाह केला. पण, त्यानंतरही प्रियकर प्रियसीला त्रास देत “तु माझी आहेस, तुला मी कोणाचाही होऊ देणार नाही” असे म्हणत दम भरत होता. त्याने प्रियसीचा ठरलेला विवाह देखील मोडला असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रशांत दिलीप हागवणे (रा. किरकटवाडी, ता. हवेली) याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २१ वर्षीय तरूणीने तक्रार दिली आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत व पिडीत तरूणीची फेसबुकवरून ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रित झाले व मैत्रिची रूपांतर प्रेमात. त्यानंतर गेली तीन ते चार वर्ष दोघेही प्रेमात होते. त्यांना विवाह देखील करायचा होता. तरूणीच्या कुटूंबाने विवाहाला परवाणगी दिली होती. मात्र, प्रशांतच्या कुटूंबाचा या विवाहाला विरोध होता. तरूणी खालच्या जातीची असल्याने हा विरोध होता. त्यातच प्रशांतने कुटूंबाच्या सांगण्यावरून दुसऱ्याच मुलीशी विवाह केला. त्यानंतर या तरूणीने प्रशांतची संपर्क बंद केला. परंतु, काही दिवसांनी पुन्हा प्रशांतने पिडीत तरूणीशी संपर्क साधण्यास सुरूवात केली. तिला दुसऱ्या क्रमांकावरून सतत फोनकरून त्रास दिला. तर, इन्स्टाग्रामवर “तु मला हवी आहेस, तु माझी नाही तर तुला मी कोणाचीही होऊ देणार नाही. मला नाही सहन होणार तु कोणाची झालेली. मला तुझ्यासोबत लग्न करायचे असून, आताच कागदपत्रे घेऊन ये, असे मेसेज त्याने केले. तसेच, तरूणीचा हडपसरमधील एका तरूणाशी विवाह ठरला होता. त्या तरूणाची भेट घेऊन हा विवाह देखील प्रशांत याने मोडून तरूणीला त्रास दिला असल्याची माहिती महिला उपनिरीक्षक रुतुजा मोहिते यांनी दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून तरूणीने पोलीसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक रुतुजा मोहिते या करत आहेत.