मनसेच नवं कार्यालय झालं पण गटबाजीच काय ! काँग्रेस, शिवसेना, मनसेला घ्यावे लागणार कष्ट

- सर्वच पक्षाच्या नेत्यांचे पुण्यातील दाैरे आता वाढले

  पुणे : महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांचे पुण्यातील दाैरे आता वाढू लागले आहे. भाजप, राष्ट्रवादी काॅंग्रेस वगळता इतर पक्षाच्या नेत्यांना पक्षाची ताकद वाढविण्यासाठी निश्चितच पुढील काळात अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन केले असले तरी पक्षातील गटबाजी थांबविण्यात त्यांना यश मिळणार का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

  राज्यातील महत्वाच्या महापालिकेपैकी पुणे ही महापालिका आहे. फेब्रुवारी महीन्यात पंचवार्षिक निवडणुक हाेणार असुन, त्यादृष्टीने आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. शहरालगत असलेली तेवीस गावे महापािलका हद्दीत समाविष्ठ करून राष्ट्रवादी काॅंग्रेसने आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. तर पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सातत्याने शहराच्या प्रश्नावर लक्ष ठेवून आहेत. गेल्या महीन्याभरात काॅंग्रेसचे प्रदेशपातळीवरील नेते सातत्याने पुणे शहरात येत आहे. पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत, उर्जा मंत्री नितीन राऊत, यांच्या पाठाेपाठ प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांचेही पुण्यात दाेन दाैरे आजपर्यंत झाले आहेत. शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी पुण्याकडे लक्ष दिले असले तरी, पुण्यातील शिवसनेला मुंबईतून कमी ताकद मिळते असा दावा शिवसैनिक करीत आहेत. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपकडून आक्रमकपणे काम सुरू आहे. एकीकडे सर्वच पक्ष कामाला लागले असताना मनसेही यात मागे नसल्याचे नवनियुक्त शहराध्यक्ष वसंत माेरे यांनी दाखवून िदले. त्यांनी पक्षाचे नवीन कार्यालय नवी पेठेत सुरू केले. या कार्यालयाच्या उदघाटनाच्या निमित्ताने पक्षप्रमुख राज ठाकरे हे देखील पुण्यात आले हाेते. मनसेमध्येही गटबाजी असली तरी अद्याप तेवढ्या उघडपणे ती िदसुन अाली नाही. यापुर्वीचे शहराध्यक्ष बाळा शेडगे, अजय िशंदे यांच्या कालावधीत नारायण पेठेत पक्षाचे कार्यालय सुरू झाले हाेते. नुकतेच पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी शहराध्यक्षपदाची महापािलकेतील गटनेते वसंत माेरे यांच्याकडे साेपविली. िशवसेनेतून फुटून राज ठाकरे यांच्याबराेबर मनसेत आलेला एक गट हा पुर्वीपासूनच पक्षातील आपले महत्व टिकवून आहे. त्यानंतर पक्षात आलेल्यांचा एक वेगळा गट असला तरी, ते अपवादात्मक परीिस्थतीत एकमेकांच्या विराेधात उभे राहीले. पक्षाचे नवीन कार्यालय सुरू झाले असले तरी कार्यकर्त्यांची एकत्रिकरण हे मनसेसमाेर अाव्हान असेल. २०१२ साली झालेल्या महापािलका निवडणुकीत मनसेने २७ जागा िजंकून धक्का िदला हाेता. परंतु, २०१७ साली मनसेचे संख्याबळ हे २ पर्यंत खाली अाले. २०२१ च्या निवडणुकीत पक्षाचे संख्याबळ वाढविण्यासाठी केवळ नवीन कार्यालयाची नाही तर कार्यकर्त्यांना बळ मिळणे आवश्यक आहे. ते बळ पक्षप्रमुख ठाकरे कसे देणार हे येणाऱ्या कालावधीत स्पष्ट हाेईल.

  तुर्तास राज ठाकरे यांनी एकला चालाे रेची घाेेषणा केली आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामाेरे जाण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही. काॅंग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरू शकते. तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस यांची आघाडी हाेण्याची अधिक शक्यता आहे. त्याचा फायदा निश्चितच शिवसेनेला अधिक हाेऊ शकताे.

  * भाजपच्या समाेर पक्षातील वाढलेली गटबाजी राेखण्यावर भर द्यावा लागणार
  * नवीन गावे समाविष्ट झाल्याने पुन्हा एकदा नव्याने प्रभाग रचना हाेणार
  * प्रभाग रचना हाच महत्वाचा मुद्दा ठरेल.