ती आई होती म्हणूनी..मुलाच्या मृत्यूनंतर मातेने ही सोडले प्राण

मुलाच्या जाण्याने आईला दुःख सहन झाले नाही. या दोघांच्या अशा मृत्यूमूळे पिंपरे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आंजना बाईंचे पती मोतीरामथोपटे हे पिंपरे गावाचे माजी सरपंच आहेत. सरपंच उत्तम कृष्णा थोपटे यांच्या त्या चुलती होत्या. आंजनाबईंचा मुलगा बरेच दिवस आजारी होता. आईचे मुलावर खूप प्रेम होते. त्यांचा लाडका मुलगा गेल्याचे दुःख त्यांना सहन झाले नाही आणि या माय लेकराला एकच वेळी निरोप देण्याची वेळ पिंपरे ग्रामस्थांवर आली

    नीरा: पुरंदर तालुक्यातील पिंपरे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील धनंजय मोतीराम थोपटे यांचा शुक्रवारी(१२) मार्च रोजी अल्पशा आजाराने सकाळी दहा वाजता मृत्यू झाला.यानंतर त्यांची आई अंजनाबाई मोतीराम थोपटे यांचा ही साडे आकरा वाजता मृत्यू झाला. आपल्या ४५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती कळल्यानंतर ७५ वर्षाच्या आंजनाबाई यांना धक्का बसला.

    या धक्क्यात त्यांचा मृत्यू झाला. मुलाच्या जाण्याने आईला दुःख सहन झाले नाही. या दोघांच्या अशा मृत्यूमूळे पिंपरे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आंजना बाईंचे पती मोतीरामथोपटे हे पिंपरे गावाचे माजी सरपंच आहेत. सरपंच उत्तम कृष्णा थोपटे यांच्या त्या चुलती होत्या. आंजनाबईंचा मुलगा बरेच दिवस आजारी होता. आईचे मुलावर खूप प्रेम होते. त्यांचा लाडका मुलगा गेल्याचे दुःख त्यांना सहन झाले नाही आणि या माय लेकराला एकच वेळी निरोप देण्याची वेळ पिंपरे ग्रामस्थांवर आली